अकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या एका ‘गांधीगिरी’ची अकोल्यात सध्या चांगलीच चर्चा आहे. या ‘गांधीगिरी’ने सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकणाऱ्या ‘पिचकारीवीरां’च्या मनोवृत्तीच्या कानफटात मारल्या गेली आहे.जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी काल अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातील भिंती पान, खर्र्ऱ्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसल्या. मग, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: बकेट आणि पाणी घेत ती भिंत साफ करायला सुरूवात केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर चांगलंच खजिल व्हायची वेळ आली. या कार्यालयातील अस्वच्छतेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना चांगलंच फैलावर घेतलं. आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेतली. अकोला शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे या कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर जनतेचा मोठा रोष आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola