अकोला :- विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोंबर 2018 पर्यंत अंतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्ष पुर्ण करणारे नागरीक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहे अशा नवमतदारांनी अदयाप मतदार म्हणून नोंदणी केले नसेल तर छायाचित्र मतदार यादयांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम अंतर्गत आपले नाव नोंदवून घ्या तसेच मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या ,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
1 सप्टेंबर ला जिल्हाधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली देवकर , निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे , उपविभागीय अधिकारी संजय खडसे , तहसिलदार विजय लोखंडे, नायब तहसिलदार सतिश कुमार काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
छायाचित्र मतदार ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही. तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. जेणे करून ऐन मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमाविण्याची वेळ येणार नाही.
यासाठी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना 6 , मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदारांने करावयाचा अर्ज नमुना 6अ, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना 7 , मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलीमध्ये दुरूस्ती करावयाचा अर्ज नमुना 8 , मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना 8अ विहित नमुन भरणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील आपले अर्ज व हरकती सर्व मतदार केंद्रावर स्विकारले जातील. तसेच प्रारून मतदार यादीत व वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या नावांची यादी पाहण्यासाठी अथवा इतर माहितीसाठी जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयास किंवा https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी. अशी माहिती जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
आज दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी महिलांमध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्या विषयी जनजागृती व्हावी म्हणून जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते घरगुती गॅस सिंलेडर व स्टिकर लावून उदद्याटन करण्यात आले तसेच अकोला महानगर पालिका यांच्या कचरा घंटा गाडीवर ध्वनी फीत वाजवून सदर कार्यक्रमाची प्रसिध्दी देण्यात येणार आहे. त्याचेही उदघाटन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी फित कापून केले.
अधिक वाचा : केरळ पुरग्रस्तांसाठी दानापूर जि. प.शाळेने काढली गावातून मदत फेरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola