मुंबई: १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकमधील भारताच्या हॉकी विजयावर आधारित अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट नवी भरारी घेण्यास सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणारा हा चित्रपट लवकरच सौदी अरेबियात प्रदर्शित होणार आहे. सौदी अरबमध्ये प्रदर्शित होणारा बॉलिवूडमधला हा पहिलाच सिनेमा ठरणार आहे.
अक्षयनं स्वत: सोशल मीडियाच्या माध्यामातून ही खूषखबर दिलीय. ‘गोल्ड’ सौदी अरेबियात प्रदर्शित होणार आहे. तिथं प्रदर्शित होणारा हा पहिला बॉलिवूडपट आहे हे सांगताना मला आनंद होतोय,’ असं ट्विट त्यानं केलंय. भारतीय हॉकी संघाचे तत्कालीन व्यवस्थापक तपन दास भारताला ऑलिम्पिकमध्ये ‘गोल्ड’ मेडल कसं मिळवून देतात, याचं थरारक चित्रण यात आहे. चित्रपटात अक्षय कुमार, मौनी रॉय, कुणाल कपूर, विनीत कुमार सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
याआधी सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ हा चित्रपट अखाती देशांमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, तो मूळचा दक्षिणेतील चित्रपट होता. त्यामुळं सौदीत प्रथम प्रदर्शित होणारा बॉलिवूडपट म्हणून ‘गोल्ड’च नाव घेतलं जाणार आहे. तिथं या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक वाचा : ‘सैफ’ चा हा हंटर लुक तुम्ही पाहिला का?
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola