• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

साऊथ सुपरस्टार Jr. NTR चे वडील नंदमुरी हरीकृष्ण यांचे अपघाती निधन

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
78 2
0
साऊथ सुपरस्टार Jr. NTR चे वडील नंदमुरी हरीकृष्ण यांचे अपघाती निधन
11
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

हैदराबाद – दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध स्टार आणि तेदेपचे नेते एन हरिकृष्ण (61) यांचे रस्ते अपघातात बुधवारी निधन झाले आहे. ते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि महानायक एनटी रामाराव यांचे सुपुत्र होते. तसेच प्रसिद्ध दाक्षिणात्य अॅक्शन हिरो ज्युनिअर एनटीआरचे वडील होते. त्यांचा दुसरा मुलगा नंदमुरी कल्याण राम सुद्धा प्रसिद्ध अभिनेता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हरिकृष्ण यांचे वाहन तेलंगणाच्या नालगोंडा येथून जात होते. त्याचवेळी ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी झाले असताना त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हरिकृष्ण एका लग्नात सहभागी होण्यासाठी नेल्लोरला जात होते.

अभिनेता आणि नेते राहिलेले हरिकृष्ण आपल्या टोयोटा फॉर्च्युनरने नेल्लोर येथील लग्नासाठी रवाना झाले होते. या दरम्यान समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांची भरधाव एसयूव्ही डिव्हायडरला धडकली आणि हवेत उडून उलटली. त्यांच्या वाहनाची स्पीड ताशी जवळपास 150 किमी होती असे सांगितले जात आहे. हैदराबादपासून 100 किमी अंतरावर असलेल्या नालगोंडा जिल्ह्यात सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात घडला. त्यांच्या एसयूव्हीने आणखी एक कार मारुती सुझुकी डिझायरलाही धडक दिली. या अपघातात हरिकृष्ण यांचे निधन झाले. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणारे इतर 3 जण जखमी आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

#SpotVisuals: Actor and TDP leader Nandamuri Harikrishna dies in a car accident in Telangana’s Nalgonda district. pic.twitter.com/4EusxbqXmw

— ANI (@ANI) August 29, 2018

अपघात इतका भीषण होता की हरिकृष्ण उलटत्या कारच्या काचा फोडून बाहेर फेकले गेले. यात त्यांच्या छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. परंतु, डोक्याची दुखापत अतिशय गंभीर असल्याने त्यांना वाचवता आले नाही. त्यांनी 1980 मध्ये आपले वडील एनटी रामाराव यांच्या प्रचारात त्यांची कार स्वतः चालवली होती. वडील मुख्यमंत्री बनले तेव्हा ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये राज्याचे वाहतूक आणि परिवहन मंत्री होते.

हरिकृष्ण यांची मुले ज्युनिअर एनटीआर आणि नंदमुरी कल्याणराम हे दोघेही दाक्षिणात्य चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध सुपरस्टार्सपैकी एक आहेत. वडिलांच्या अपघाताची माहिती मिळाली तेव्हापासूनच ते रुग्णालयात होते. प्रत्यक्षात हरिकृष्ण यांना एकूण 3 मुले होती. परंतु, त्यांचा सर्वात मोठा मुलगा जानकीराम याचे 2014 मध्ये रस्ते अपघातात निधन झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2009 मध्ये ज्युनिअर एनटीआरच्या वाहनाला सुद्धा भीषण अपघात झाला होता. परंतु, तो या अपघातातून बालंबाल बचावला.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: jr. ntrNandmuri harikrishnaNandmuri harikrishna passes away
Previous Post

अडगाव बु येथे शेतकरी संघटना ची सभा संपन्न, शेती व्यवसाय मधील शासकीय हस्तक्षेप कमी करावा – ललित दादा बहाळे

Next Post

धावपटू दुती चंद ने जिंकले रौप्य पदक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
दुती चंद

धावपटू दुती चंद ने जिंकले रौप्य पदक

अकोला जिल्हा भारीप बमस महीला आघाडीच्या वतिने तेल्हारा येथे बैठक संपन्न

अकोला जिल्हा भारीप बमस महीला आघाडीच्या वतिने तेल्हारा येथे बैठक संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.