अकोला : केरळ येथील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून आज जिल्हयातील पहिली ई-रिक्शाचालक महिला रेखा किर्तीराज चव्हाण यांनी रक्षाबंधनाची ओवळणी रुपये एक हजार जिल्हाधिकारी कार्यालयातील मदत कक्षाच्या माध्यमातून ऑनलाईन जमा केली. याबददल स्वत: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी श्रीमती रेखा यांचे कौतुक केले. तसेच बार्शिटाकळी येथील सेवानिवृत्त पुरवठा निरीक्षक प्रभाकर उत्तमराव मानकर यांनी रुपये 1100/- चा निधी ऑनलाईन जमा केला.
दरम्यान, आज स्व. दिवालीबेन सैदानी इंग्लीश स्कूल, अकोट येथील विदयार्थ्यांनी रुपये 11 हजार ऑनलाईन निधी जमा केला. यावेळी प्रशालेच्या अध्यक्षा स्मिता सैदानी, प्राचार्य विजय भागवतकर, मुख्याध्यापक प्रशांत मंगळे, स्नेहल अभ्यंकर, चंचल पितांबरवाले, निहाल राजगुरु आदी उपस्थित होते. तसेच मौजा घुसरवाडी येथील ग्रामस्थांतर्फे लक्ष्मीकांत जानराव घावट, दादाराव बाबन घावट रुपये 6 हजार 825/- ऑनलाईन निधी जमा केला. या सर्व दानशूर व्यक्तींचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. ऑनलाईन निधी जमा करण्यासाठी जिल्हा हेल्प डेस्कचे प्रसाद रानडे यांनी सहकार्य केले.
केरळ राज्यात अतिवृष्टीमुळे महाप्रलयकारी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे या राज्यातील पुरग्रस्तांना भरीव मदत करण्याकरीता अकोला जिल्हयातील नागरिकांनी व सर्वच घटकातील व्यक्तींनी सहृदयतेने यथाशक्य आर्थिक मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहे.
दरम्यान, आर्थिक मदतीकरीता ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा केरळ शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. ‘मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधी’ (सीएमडीआरएफ) या नावाने निधी पाठविता येणार आहे. ऑनलाईन सेवेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
https://donation.cmdrf.kerala.gov.in/ उपकार्यक्रमाचे नाव – मुख्यमंत्री महोदयांचा संकटकालीन मदत निधी, खाते क्र. 6731 9948232, भारतीय स्टेट बँक, शाखा – तिरुअनंतपुरम, IFSC कोड – SBIN 0070028, PAN – AAAGD0584M, खाते प्रकार – बचत, SWIFT CODE – SBININBBT08.
सदर ऑनलाईन पध्दतीने पैसे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील शैक्षणिक गुणवत्ता कक्ष येथे मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षात हर्षदा काकड, प्रकाश अंधारे, प्रसाद रानडे, विशाल ढाकरगे, सचिन भांबेरे, संतोष इंगळे, हितेश राऊत, प्रसाद देशमुख यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी प्रकाश अंधारे, मो.क्र. 8484906992 आणि प्रसाद रानडे, मो.क्र. 9822712562 या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर मदत निधी हा शंभर टक्के करमुक्त आहे. आपदग्रस्तांना मदत करणे हे एक मानवी कर्तव्य असून आपल्या अल्पशा मदतीव्दारे केरळवासियांचे मनोबल उंचावेल, त्याकरीता बहुसंख्य नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
हेही वाचा : शिवाजी नगर येथे तंन्टामुक्ती अध्यक्ष पदी श्रीकृष्ण शामराव निमकडेॅ यांची अविरोध निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola