अकोला : वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत ६ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला शहर,अकोट व अकोला ग्रामीण या तिनही विभागामध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार ३७२ जणांवर तर कलम १२६ नुसार २४ ग्राहकांवर अशा एकूण ३९६ जणांवर कारवाई करण्यात आली. जवळपास ३३ लाख ८० हजाराची चोरी झाल्याचे निदर्शनास आले, यामध्ये ३८ जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्या निर्देशानुसार अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते प्रशांत दाणी (अकोला शहर), प्रमोद काकडे(अकोट) तसेच गजेंद्र गडेकर (अकोला ग्रामीण) या विभागामध्ये विविध पथकामध्ये १६३ अभियंते,अधिकारी कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला..
वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-या ग्राहकांमध्ये अकोला शहर विभागातील ६७, अकोट विभागातील ८३, तर अकोला ग्रामीण विभागातील २२२ अशा एकून ३७२ जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली, यातील ३८ जणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्या अकोला शहर विभागातील ०४, अकोट विभागातील ०१, तर अकोला ग्रामीण विभागातील १९ अशा एकून २४ जणांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली.
संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीसुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये एकूण २६२ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.
हेही वाचा : गोवर रुबेला लसीकरण मोहिम काटेकोरपणे राबवावी – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे निर्देश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola