अकोला – माहे नोव्हेंबर 2018 मध्ये 9 महिणे ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेरा लसीकरण करावयाचे आहे. हि मोहिम काटेकोरपणे राबविण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमील पठाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, महिला व बालकल्याण अधिकारी श्री. जवादे, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, डॉ. सिमा तायडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी तालुका स्तरावर वैद्यकीय अधिकारी नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावा, तसेच तालुकास्तरावर तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच संबंधीत तालुका स्तरीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात यावी. वैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक, तलाठी , मुख्याधापक, अंगणवाडी सेविका आशा वर्कस् यांच्या सोबत बैठक घेवून लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित राहणार नाही यांची खबरदारी घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सर्व संबंधीत यंत्रणेनी समन्वय साधून ही मोहिम राष्टहितासाठी तसेच समाजहितासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून यशस्वी करावी.
पुढील सप्टेंबर-ऑक्टोंबर महिण्यात सदर मोहिमेबाबत जनजागृती करावी यासाठी गोवर रुबेला लसीकरण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करावे. पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांची जनतेला आवाहन करणारी एक-दोन मिनिटाची चित्रफित तयार करुन व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या सोशल मिडीयावरुन प्रसारीत करावी, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले. हा लसीकरण कार्यक्रम राबविताना शंभर टक्के हायजीनचे पालन करावे.
या कार्यक्रमात शाळा तसेच सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आदिना सहभागी करुण घ्यावी ही मोहिम राबविताना शाळा हा केन्द्स्थानी समजून पालकांना लसीकरण सुरक्षित व फायदांचे आहे याबाबत पालकांन मध्ये जनजागृती करावी, जेणेकरुन आपल्या पाल्यांला गोवर रुबेलांची लसीकरण करुन घेतील. ही मोहिम शासकीय, निम्म शासकीय, खाजगी तसेच कॉनवेंट व मदरसा मध्ये राबवून शाळेतील विद्यार्थ्याना लाभार्थी करुन घ्यावे. मोहिम शंभर टक्के यशस्वी होईल यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सदर लसीकरण कार्यक्रम चार टप्पयात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात गोवर व रुबेलची लस प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येईल. दुसऱ्या टप्यांत शाळाबाहय विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. तिसऱ्या व चौथ्या टप्यांत शाळेत गैरहजर असलेल्या व इत्तर नऊ महिने ते 15 वर्षाखालील बालकांना ही लस देण्यात येईल. लसीकरणाच्या वेळी बालकांच्या डाव्या हातांच्या अंगठयावर मार्करने खूण करण्यात येईल. त्यानंतर त्यांना लसीकरण बाबतचे प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एम.एम. राठोड यांनी दिली. या कार्यक्रमाचे जिल्हा समन्वय डॉ. ठोसर हे आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीची सभा यावेळी घेण्यात आली. स्त्री रुग्णालयातील बांधकाम, बाल जन्मदर, जननी सुरक्षा योजना, पदभरती, लेडी हार्डीग्ज समोरचे ड्रनेज अतिक्रमण, नर्सिग हॉस्टेल बळकटीकरण, वॉटर फ्रुफींगचे कामे, औषधी खरेदी, सिकलसेल आदि बाबतचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतला.
अधिक वाचा : पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना लवकरच मिळतील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola