• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना लवकरच मिळतील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : ज्या शेतकऱ्यांना अदयाप पिक विमाचे पैसे मिळाले नाही, त्यांना ते लवकरच मिळतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश होऊ नये. ज्या मंडळामध्ये पिक विमा लागू झालेला आहे आणि पिक विम्याची पावती असणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत पिक विम्याचे पैसे मिळतील, असा दिलासा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शेतकऱ्यांना दिला.

प्रधानमंत्री पिक विमा योजना, फळपिक विमा योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, नॅशनल इंशोरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी शाम चिवरकर आदींसह अन्य विमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, बँक अधिकारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पिक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, पिक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले, पिक विमा रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाली, बोंडअळी नुकसान भरपाई मिळावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची भरपाई मिळावी आदी स्वरुपाच्या तक्रारी मांडल्या. अकोट तालुक्यातील शेतकरी शालीकराम बुले यांचे पिक विम्याचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्या आहेत, याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी म्हणाले की, येत्या पंधरा दिवसांत जिल्हा मध्यवर्ती बँकेने श्री. बुले यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, पैसे जमा न झाल्यास बँकेवर कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांना विमाचा लाभ भेटला नाही, त्यांची यादी येत्या तीन आठवडयात प्रसिध्द होणार आहे.

या यादीत विमाधारक ज्या शेतकऱ्यांचे नाव नसेल तर यावर विमा कंपनीने तातडीने कार्यवाई करुन संबंधित शेतकऱ्यांना विमाचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच मार्च-2017 पूर्वी ज्या शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा झाले आहेत, याबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी राज्यस्तरीय बँक समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पिक विम्याबाबत तक्रारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत समाधान केले. पिक विमा भरपाईच्या दोन यादया अदयापपर्यंत प्रसिध्द झाल्या आहेत. त्यापैकी पहिली यादी 6 जून रोजी प्रसिध्द झाली. सुमारे 63 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दुसरी यादी 16 जुलै रोजी प्रसिध्द झाली. याव्दारे सुमारे 39 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तिसरी यादी तीन आठवडयात प्रसिध्द होणार आहे. त्याव्दारे उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळतील, अशी माहिती श्री. चिवरकर यांनी यावेळी दिली.

अधिक वाचा : अकोट शहरातील बोगस डॉक्टर प्रकरणात आणखी एका डॉक्टर वर गुन्हा दाखल वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: AkolaAkola news in Marathiअकोलाजिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय
Previous Post

महादेवराव सातपुते यांच्या रस्त्याच्या मुंडन आंदोलनास मिळाले यश

Next Post

तोंड दाखवाल तरच नवे सिमकार्ड मिळेल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सिमकार्ड

तोंड दाखवाल तरच नवे सिमकार्ड मिळेल

अकोला

गोवर रुबेला लसीकरण मोहिम काटेकोरपणे राबवावी - जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे निर्देश

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.