तेल्हारा(विलास बेलाडकर)- अकोल्यातील बहुचर्चित आसिफ खान हत्येप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळाले असुन मात्र आसिफ खान यांचा मृतदेह अद्याप गवसला नसल्याने अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर हे स्वतः पूर्णा नदी काठावरील गावामध्ये जाऊन स्वतः मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आसिफ खान यांचा खून करून मृतदेह मैसांग जवळच्या पूर्णा नदीमध्ये फेकून दिल्याचे आरोपींनि कबुली दिल्यावर पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेणे सुरू केले असून संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक व पोलिस शोध घेत असताना आज स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर वांगरगाव येथील पूर्णा नदीच्या काठावर पाहणी केली.यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे व तेल्हारा पोलीस यांनी शोध घेतला.
हेही वाचा : तंटामुक्त गावसमिती गाडेगांव च्या अध्यक्ष पदी सहदेवराव नळकांडे यांची बिनविरोध निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola