अकोला: जिल्ह्यात 16 ऑगस्ट रोजी बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील आसिफ खान यांच्या हरविले बाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस यांनी तपासा बाबत कमालीची गुप्तता पाळली होती मात्र पोलिसांनी आरोपी महिला हिला ताब्यात घेतले असता आरोपी महिलेने हत्येची कबुली दिली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली होती यामध्येच रामदास पखाले,अशोक सावंत ,व वारिसभाई हे फरार आरोपी असल्याचे सांगितले होते सर्व आरोपींनि आसिफ खान यांची हत्या केल्यानंतर प्रेत पूर्णा नदी पात्रात फेकून दिले असे आरोपींनि सांगितले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले होते परंतु शव अद्याप मिळाले नाही त्यामुळे सध्या आरोपींना अपहरण प्रकरणात 3 आरोपींना अटक केली असून त्यांना विद्य न्यायालयात सादर केले असता आरोपींना 27 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत त्यात रामदास पखले, अशोक सावंत वारीसभाई हे रा काजलेश्वर हे फरार आहेत यांना कारंजा येथून अटक करण्यात अकोला पोलिसांना आज यश आले आहे मात्र आसिफ खान यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलीस आजही आपल्याशीच ठरले आहेत.
नदीला मोठा पूर गेला असल्याने शव सहज मिळणे शक्य नाही त्यामुळे पोलिसांनी पूर्णा नदी काठावरील रहिवाशी कुणाला शव मिळाल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासगर यांनी काल पत्रकार परिषदेत केले होते त्यामुळे या हत्याकांडातील सर्व 6 आरोपींना पोलीस यांनी अटक केली आहे मात्र मृतदेह मिळाला नसल्याने पोलीस यांची डोकेदुखी थांबली नाही आहे.