प्राचीन जगाच्या इतिहासात मिस्त्र, मेसोपोटेमिया,ग्रीक,रोमन, सिंधु इत्यादी संस्कृती उदयास आल्या. या सर्व संस्कृतीमध्ये सिंधू संस्कृती सर्वात उच्च स्थानी होती. सिंधू संस्कृतीचा मूळात पायाच हा शिक्षणावर आधारित होता. या अति उच्च नागरी संस्कृती तील भूमीगत गटारे रचना आजच्या भारताला सुद्धा लाजीरवाणी ठरवू शकते.
त्यानंतर या देशावर आर्य आक्रमण झाली संपूर्ण देश कर्मकांडाच्या ओझ्याखाली दबला.
इ.स पूर्व ५६३ साली भगवान गौतम बुद्ध या युगपुरुषाचा जन्म झाला या महात्म्याने जगाला अत्यंत पुढारलेली संस्कृती अथवा विचार दिले.नालंदा, तक्षशिला अशी जागतिक दर्जाचे विद्यापीठ जगाला दिले.जगाला हेवा वाटावा अशा वेरुळ, अजिंठा लेण्यांनी बौद्धांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
या नंतर या देशात महात्मा बसवेश्वर,संत तुकोबाराय (संपूर्ण वारकरी संप्रदाय), छत्रपती संभाजीराजे, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांनी शिक्षणा वाचून राष्ट्र प्रगती करुच शकत नाही हा संदेश दिला.
विषयाकडे वळूया
स्वातंत्र्या नंतर देशाची स्थिती मोठ्या प्रमाणावर बदलू लागली,देश झपाट्याने आर्थिक प्रगती करत आहे फ्रान्स ला मागे टाकून आज भारतीय अर्थव्यवस्था ६ व्या क्रमांकाची बनली आहे लवकरच क्रमांक ४ वर येईल.पण शिक्षणा शिवाय घडलं नाही.
आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागास,मानवी विकास निर्देशांक अत्यंत कमी,अति जास्त लोकसंख्येची घनता असलेले उत्तर भारतीय राज्य तर अत्यंत पुढारलेले, उच्च मानवी विकास निर्देशांक असलेले दक्षिण भारतीय राज्य.हा असमतोल केवळ एका ‘शिक्षणाने’ मुळे झाला आहे.ही दरी कमी करण्यात भारताचा कितीतरी मोठा पैसा खर्च होत आहे.
U.P.A सरकार जिडीपीच्या ४.५% निधी शिक्षणासाठी खर्च करत होती तर वर्तमानातील सरकारने शिक्षणाचा वाटा ३.५% वर आणलेला आहे.ही अत्यंत खेदजनक बाब आहे. हा १% उल्लेखनीय आहे(१%म्हणजे जवळपास १५००० कोटी).
आज बहुतांश विकसित राष्ट्रांनी भारतीय ‘मानवी संसाधन’ आयात केलेले आहे द्विपक्षीय व्यापार तूट, तसेच इतर व्यापारतूट या राष्ट्रांनी शिक्षणातून मिळवलेल्या तंत्रज्ञानातून कमी केली आहे.
भारताचा व्यापार हा म्हणजे भारत नैसर्गिक साधनसंपत्ती निर्यात करतो तर तंत्रज्ञान, इत्यादी आयात करतो.म्हणूनचं भारताची व्यापार तूट अत्यंत जास्त आणि तळातील क्रमांकावर आहे.
एनडीए सरकार देशात आयआयटी, एम्स शिक्षण संस्था उभारत आहे ही बाब गौरवास्पद आहे पण प्राथमिक शिक्षणाची स्थिती बिकट आहे.
शेवटी, भारताला आरोग्य,लोकसंख्या नियंत्रण, स्वच्छता, उच्च राहणीमान म्हणजेच समग्र आर्थीक विकास आणि यामधून ‘महासत्ता’ व्हायचं असेल तर त्याचा मार्ग व्हाया ‘शिक्षण’ असा जातो.
सुमित कोठे
अधिक वाचा : ‘सध्याच्या भिषण स्थीती वर माझा लेख’