कोलकाता : लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होते. हा विकार बळावल्यानं १० ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उलट त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली. त्यामुळं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.
सोमनाथ चॅटर्जी हे भारतीय हिंदू महासभेचे संस्थापक सदस्य असलेले सुप्रसिद्ध वकील निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे चिरंजीव. मात्र, राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून १९६८ साली केली. त्यानंतर २००८ पर्यंत ते पक्षासोबत होते. १९७१ साली पहिल्यांदा खासदार झालेल्या चॅटर्जी यांनी नंतर मागे वळून पाहिलंच नाही. तब्बल दहा वेळा ते देशाच्या लोकसभेत निवडून गेले. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत चॅटर्जी यांना एकच पराभव पत्करावा लागला होता. १९८४मध्ये जादवपूर मतदारसंघातून त्यांना ममता बॅनर्जी यांनी मात दिली होती.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola