अकोट( सारंग कराळे): अकोट शहरातील नगर पालीकेचा भोगंळ कारभार वेळोवेळी अकोट कराच्या समोर आला असुन हलगर्जी पणाचे अजुन एक जिवंत उदाहरण म्हणजे अकोट शहरातील काही भागातील गल्ली बोळीतील पथंददिवे गेल्या 8 दिवासापासुन 24 तास चालु असुन एकीकडे सरकार विज वाचवाच्या जाहीरातीवर लाखो रुपयाची उधळण करत असुन दुसरीकडे अकोट नगर पालीकेचा विद्दुत विभाग माञ गेले आठ दिवसा पासुन कुभंकरणी झोपेत आहे.
पथंदिवे दिवसा चालु असल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकानी नगर पालीकेच्या विद्दुत विभागाला दिली होती खरी, तरी त्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई न करता उलट रोज राञी पथंदिवे चालु करावीच लागते त्यामुळे दिवस भर चालु राहली तर काही फरक पडत नाही तसेही सी एफ एल लाईट असल्यामुळे विज पण कमी लागते अशाप्रकारची बेजबादार प्रतीक्रीया समोर आली असुन विद्दुत विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली असल्याची माहीती आहे. अकोट कर जनता मुलभुत सुविधे करीता विविध स्वरुपात नगर पालीकेला कर अदा करत असते त्याची उधळपट्टी करुन न.पालीकेचा विद्दुत विभाग अकोट नगर पालीकेच्या तिजोरीवर आणखी ताण वाढवत असल्याचे दिसत आहे.