• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

शासकीय रुग्णालयातील रुग्णांना मिळणार उत्तम दर्जाच्या सुविधा – पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला येथील शासकीय वैदयकीय महाविदयालय व सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना आता चांगल्या उपचारांच्या सुविधा मिळण्याबरोबरच औषधेही तातडीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी वैदयकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन रुग्णसेवा व वैदयकीय महाविदयालयातील समस्येबाबत चर्चा केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 8 सहयोगी प्राध्यापक व 15 सहाय्यक प्राध्यापकांची अशी एकूण 23 पदे रुपांतरीत करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीत्तर अभ्यासक्रमाचा मार्गही सुकर होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 8 सहयोगी प्राध्यापक व 15 सहाय्यक प्राध्यापकांची अशी एकूण 23 पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. या पदांची निर्मिती झाल्यानंतर सध्यस्थितीत चालू असलेल्या 10 विषयांतील पदवीत्तर अभ्यासक्रमासोबत उर्वरित 10 विषयांमध्ये पदवीत्तर अभ्यासक्रमाची निर्मिती होणार आहे. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात तज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊन रुग्णसेवांमध्ये आमुलाग्र बदल होणार आहे. यासाठी मुंबईत दि. 7 ऑगस्ट रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री ‍गिरीश महाजन यांच्यासोबत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वैद्यकीय शिक्षणमंत्री ‍गिरीश महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण खात्याचे प्रधान सचिवांसोबत दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सदर बाबींबाबत निर्देश दिले. प्रधान सचिव यांना दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते पदे रुपांतरीत करण्याबाबतचा प्रस्ताव त्वरीत शासनाकडे सादर करणार आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषधाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. याची दखल घेत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार कार्यालय प्रमुखाची आकस्मित औषध खरेदीची मर्यादा 5 हजारावरुन 1 लाख रुपयांपर्यत वाढविण्यात आलेली आहे. यामुळे रुग्णांना लागणा-या आवश्यक औषधीची खरेदी करुन रुग्णांना उत्तम सेवा देण्यात येणार आहे.

डॉ. रणजीत पाटील स्वत: वैदयकीय व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांना रूग्णांबदृदल आस्था आहे. रुग्णांना वैद्यकीय सेवा उत्तम व दर्जेदार मिळण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे शासकीय वैदयकीय महाविदयालय व सर्वोपचार रूग्णालयाला वेळोवेळी भेट देवून रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतात. यासाठी वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता तसेच वैदयकीय अधिकारी यांच्याशी ते नेहमी चर्चा करत असतात.

नुकतीच दि. 6 ऑगष्ट रोजी पालकमंत्री यांन अकोल्याचे अधिष्ठाता यांच्या कक्षात शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या प्रशासकीय तसेच रूग्णांच्या आरोग्य सेवेबाबत आढावा घेतला. पॅथालॉजी रुग्णालयातील आंतर रुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभाग, विविध शस्त्रक्रिया, रक्तपेढी, अतिदक्षता विभाग, एमआरआय, औषधांचा साठा, रुग्णवाहिका आदींची सुक्ष्म माहिती घेऊन आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सेवेत सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री यांच्या निर्देशामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ईलेक्ट्रीक विभागाकडून प्रलंबित असलेली सर्व कामे करण्यात आलेली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

अधिक वाचा : जिल्हा परिषदमधील रिक्त पदांवर तात्काळ अधिकारी नियुक्त करणार

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: AkolaDr. Ranjit Patilअकोला
Previous Post

जिल्हा परिषदमधील रिक्त पदांवर तात्काळ अधिकारी नियुक्त करणार -पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

Next Post

यमला पगला दिवाना फिर से चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
यमला पगला दिवाना फिर से

यमला पगला दिवाना फिर से चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

येवदा येथील नकुल सोनटक्के यांनी गावासाठी केला अन्न त्याग

येवदा येथील नकुल सोनटक्के यांनी गावासाठी केला अन्न त्याग

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.