उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी नागरिकांनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज चा वापर टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.
राष्ट्रीय सण व इतर महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर नागरिक व विद्यार्थ्यांनी आणलेले प्लास्टिक तसेच कागदी ध्वज मैदानात किंवा रस्त्यावर फेकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाची अवमानना होते. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी घातली आहे.
रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे. जमा राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयास सुपूर्द करावेत, असे आवाहन मुद्गल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
विक्रेत्यांवर होणार कारवाई
आगामी १५ ऑगस्ट रोजी अशा प्रकारच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा. शासन निर्णयानुसार प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस पायबंद घालण्याकरिता त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाद्वारे कारवाई करण्यात येईल. कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. खराब झालेले ध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत स्वच्छ जागेत सन्मानपूर्वक नष्ट करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अधिक वाचा : भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत व्हिसा मुक्त प्रवेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola