अगदी वीस-एक वर्षांपासून महाविद्यालयीन (College) जिवनावर आधारित अनेक चित्रपट आले आणि या चित्रपटात अफेअर (लफडं) मध्ये खुप आनंदात जगत असलेले विद्यार्थी अशा आशयावर कथा बनवल्या गेल्या आणि याचा परिणाम असा झाला की शहरांपासून तर खेड्यांपर्यंतच्या महाविद्यालयात हे प्रकरण वाढायला लागली आणि तरूण मुलं गुणवत्ता पूर्ण शिक्षणापासून वंचित होऊ लागली.
हा प्रकार एवढ्या वरचं थांबला नाही तर शालेय जिवनात लफड्यां मध्ये गुंतलेली आणि आनंद घेत असलेली चित्रपट उदा. भुवया उडवणारी प्रिया प्रकाश वारीयर जिला INDIAN CRUSH म्हटल्या गेलं,याचा परिणाम असा होत आहे की महाविद्यालयीन जिवनात चाललेले हे प्रकार हे शाळेत अगदी पाचव्या वर्गापर्यंत पोहोचले आहेत.याला कोवळी मुलं बळी पडता आहेत.यात मुलांचा तरी काय दोष आजुबाजुला बघतात आणि अनुकरण करतात.एवढंच नव्हे तर स्त्री शिक्षीकेकडे सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे.
ही बाब सहजासहजी घडत नसुन बहुजनांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट आहे.बहुजनांची मुलं शिक्षणापासून वंचित राहिली तर परत हा देश निश्चितच गुलामगिरी च्या अंधारात लोटला जाईल.
शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे ते घेतल्या नंतर तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही आणि जो शिक्षणापासून वंचित असेल तो पशुसमान होईल तो शरीराने वाढलेल्या बोकडासारखा होईल.
एक गुराखी काही शे पशुंना हाकलु शकते तर एका वाघाची डरकाळी हजारो बोकडांना भयभीत करू शकते.तर सर्काशीतला रिंग मास्टर दाहेक सिंहांना आपल्या तालावर नाचवु शकतो. तर अशिक्षित जनतेला मुठभर लोक मुर्ख बनवु शकतात
शालेय आणि महाविद्यालयीन जिवनातील शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे.
-सुमित कोठे
(तेल्हारा)
अधिक वाचा : दीड पटीचा जुमला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola