लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदकाची कमाई करणाऱ्या सायना नेहवाल ची जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. अलीकडेच चीन, नानजिंग येथे पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत सायनाला कॅरोलिना मरिनकडून सहज पराभव पत्करावा लागला होता. यामुळे ती अव्वल दहातून बाहेर पडली असून ती आता ११व्या क्रमांकावर घसरली आहे.
याच जागतिक स्पर्धेत उपविजेती ठरलेली सिंधू तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तैपईच्या ताय झ्यू यिंगने अव्वल क्रमांक कायम राखला असून दुसऱ्या क्रमांकावर जपानची अकेन यामागुची आहे.
पुरुषांच्या रँकिंगमध्ये किदाम्बी श्रीकांतची दोन क्रमांकांनी घसरण झाली असून तो आठवा घसरला आहे. तर प्रणॉय ११व्या क्रमांकावर कायम आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना दोन क्रमांकांचा फायदा झाला असून ते २३व्या क्रमांकावर आले आहेत. महिला दुहेरीच्या अव्वल वीसमध्ये मात्र भारताची एकही जोडी नाही. प्रणव जेरी चोप्रा-सिक्की रेड्डी ही मिश्र दुहेरीची जोडी रँकिंगमध्ये २४व्या क्रमांकावर आहे.
अधिक वाचा : वेटलिफ्टर मीराबाई चानू ची आशियाई स्पर्धेतून माघार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola