कराकस: (अवर नेटवर्क वेब टीम) व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका ड्रोन हल्ल्यातून शनिवारी थोडक्यात बचावले आहेत. एका वृत्तवाहिनीवर लाइव्ह भाषण करत असताना ही घटना घडली. राजधानी कराकस येथे आपल्या लष्कराच्या शेकडो सैनिकांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, निकोलस मादुरो हे या हल्ल्यातून बचावले असून ते सुरक्षित आहेत. पण या हल्ल्यात त्यांचे सात सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर थोड्याचवेळात व्हेनेझुलेलाचे सुचना मंत्री जॉर्ज रोड्रिग्ज यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ड्रोनमध्ये स्फोटकं भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला करण्यात आला होता, पण सुरक्षारक्षकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या हल्ल्यामुळे कार्यक्रमाच्या आसपास असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचाही फुटल्या. हा हल्ला नेमका कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र राष्ट्रपतींवर हल्ल्यासाठी विरोधी पक्षांच्या आंदोलकांवर सरकारकडून आरोप केले जात आहेत. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
बघा व्हिडिओ:
#BREAKING: #Venezuela: New video of #Maduro security personal protecting him during tonight’s assassination attemp pic.twitter.com/qDEetVp0fQ
— Amichai Stein (@AmichaiStein1) August 5, 2018