• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबील मिळण्यासाठी महावितरणकडून केंद्रीय पध्दतीने बिलींग, छपाई व वितरण,देशात प्रथमच नाविन्यपूर्ण प्रयोग

Editor by Editor
May 20, 2020
in Featured, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
81 0
0
तेल्हारा
12
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.- राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूक वीजबील मिळावे तसेच ग्राहकांना वीजबील भरण्यासाठी अधिक कालावधी मिळावा याकरिता महावितरणच्यावतीने वीजबिलांची छपाई व वितरण केंद्रीयस्तरावर करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरूवात झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पध्दतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांना प्रॉम्ट पेंमेंट डिस्कॉऊंटचा लाभ घेता येईल.

महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीजबिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यन्त पोहोचण्यासाठी साधारणत: ७ ते ८ दिवसांचा अवधी लागतो. ग्राहकांना वेळेत वीजबील न मिळाल्यामुळे त्वरीत देयक प्रदान दिनांक अंतर्गत मिळणारी सूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) मिळण्यास ग्राहकांना अडचणी येत होत्या. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर संनियंत्रण ठेवणे कठीण जात होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महावितरणच्यावतीने केंद्रीय पध्दतीने वीजबिलाची छपाई व वितरण करण्यात येणार आहे. मोबाईल मीटर रिडिंग ॲपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाईम) मीटरवाचन तसेच चेक रिडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पध्दतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त अचूक वीजदेयक मिळेल तसेच त्यांना वीजदेयक भरण्यासाठी अधिकचा कालावधी मिळाल्यामुळे वीजदेयक भरणा केंद्रातील रांगा कमी होतील व देयक भरणे अधिक सोयीचे होईल.

मुख्यालयातील सर्व्हरवर बील तयार करण्यात येणार असून हे बील परिमंडलस्तरावर वीजबील वितरणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या एजन्सीकडे २४ तासांत पाठविण्यात येईल. त्यानंतर या एजन्सीकडून सदर वीजबील शहरी भागात ४८ तासात आणि ग्रामीण भागात ७२ तासांत वितरीत करण्यात येईल्. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना वीजबील न देणाऱ्या एजन्सींना दंड आकरण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना वेळेत वीजबील मिळून प्रॉम्ट पेंमेंट डिस्कॉऊंटचा लाभ घेता येईल.
या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ, वसुली कार्यक्षमतेत वाढ व थकबाकी तसेच वाणिज्यिक हानीत घट, उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, बिलींग, छपाई व वितरण् खर्चात मोठी बचत, संपूर्ण व्यवस्थेवर केंद्रीयस्तरावरून नियंत्रण, बिलींग तक्रारीच्या प्रमाणात घट व संपूर्ण बिलींग व्यवस्थेवर माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संनियंत्रण इत्यादी लाभ होणार असून त्या सर्वांचा फायदा ग्राहकांना होईल.

Previous Post

व्हिडिओ ब्रेकिंग: तेल्हारा शहरात आमदार प्रकाश भारसाकडेंना सकल मराठा बांधवानी घातला घेराव

Next Post

जिल्हाधिकारी सह पोलीस अधिक्षक यांनी केली कावड यात्रा मार्गाची पाहणी,कावडधारकांची गैरसोय होता कामा नये,संबंधित अधिकाऱ्यांना दिले आदेश

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जिल्हाधिकारी सह पोलीस अधिक्षक यांनी केली कावड यात्रा मार्गाची पाहणी,कावडधारकांची गैरसोय होता कामा नये,संबंधित अधिकाऱ्यांना दिले आदेश

जिल्हाधिकारी सह पोलीस अधिक्षक यांनी केली कावड यात्रा मार्गाची पाहणी,कावडधारकांची गैरसोय होता कामा नये,संबंधित अधिकाऱ्यांना दिले आदेश

व्हिडिओ: व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला; थोडक्यात बचावले

व्हिडिओ: व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला; थोडक्यात बचावले

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.