अकोला दि. 04 :- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शेतकरी आत्मघातग्रस्त कुटूंबातील महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उस्फुतर्ग् प्रतिसाद मिळाला असून विविध संस्थेकडून 7 लक्ष कापडी पिशव्या खरेदी करण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सभागृहात विविध संस्था व कापडी पिशव्या तयार करणा-या महिलांचा मेळावा आयोजित करण्यातआला होता. यावेळी आमदार हरीष पिंपळे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, वावर प्रकल्पाचे नोडल ऑफीसर तथा अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, माविमच्या व्यवस्थापीका वर्षा खोब्रागडे, तहसलिदार राहुल तायडे, रवि काळे, रामेश्वर पुरी, पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, नायब तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर, राजेंद्र इंगळे, हर्षदा काकड, योग शिक्षक मनोहर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज झालेल्या सभेत विविध महिला संघटनेनी कापडी पिशव्या शिवण्याची नोंदणी केली. तसेच होटल असोशिएशनचे अध्यक्ष रुपेश अग्रवाल यांनी प्रत्येक महिन्याला किमान 1 लक्ष कापडी पिशव्या खरेदी करण्याची मागणी नोंदवली. माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येकी 10 हजार, रास्तभाव दुकानदार संघटना 20 हजार, निरंकारी ऑपसेट 20 हजार, वरिष्ठ महाविद्यालय 2 हजार 500, इतर संघटना 50 हजार तर मुर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे यांनी रोपवाटीकेसाठी 5 लाख पिशव्यांची मागणी नोंदविली.
जिल्हा प्रशासनाच्या महत्वाकांक्षी वावर प्रकल्पाला शासनाकडून मान्यता मिळाली असून यासाठी भरीव निधी लवकरच मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. वावर प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हयातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या महिलांनी निर्माण केलेल्या कापडी पिशव्या बाजार भावाने खरेदी करण्याची हमी अकोला जिल्हा प्रशासनाने घेतली होती. या आवाहनाला विविध सामाजिक संस्थांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यामुळे वावर प्रकल्पाच्या दिशेने टाकलेले प्रशासनाचे पाऊल यशस्वी झाले असल्याचे दिसून येत असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या आवश्यतेनुसार विविध आकाराच्या कापडी पिशव्या महिलांनी शिवून दयाव्या, त्या खरेदी करण्याची सांगड जिल्हा प्रशासन घालून देणार आहे. व्यापारी आणि कापडी पिशव्या शिवणा-या महिला यातील दुवा म्हणून जिल्हा प्रशासन काम करणार आहे.
पुढीलवर्षी शासनाचा 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी रोप वाटीका करीता लागणा-या सुमारे 5 लक्ष कापडी पिशव्या खरेदी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
कापडी पिशव्या शिवण्याच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ही प्रशंसनीय बाब असून जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळावा अशी आशा व्यक्त करुन आमदार हरिष पिंपळे म्हणाले की, मुर्तिजापूर मतदार संघासाठी लागणा-या रोपवाटीकेसाठी 5 लाख कापडी पिशवी विकत घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहरराव इंगळे यांनी माझोड ग्रामपंचायतीच्या महिलांनी तयार केलेल्या 250 कापडी पिशव्या मान्यवरांच्या उपस्थितीत विकत घेवून या योजनेचा शुभारंभ केला. मुर्तिजापूरचे मिलींद जामणीक यांनी 150 महिलांना पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गुणवंत्ता विकास कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. यावेळी माविमच्या वर्षा खोब्रागडे, शिवतेज प्रतिष्ठानचे मनोहरराव इंगळे, तहसिलदार रामेश्वर पुरी, हॉटेल असोशिएशनचे उपेश अग्रवाल, जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण लवटे, माझोडच्या सरपंच जयोस्ना खंडारे, मानव साधन केंद्र पातूरच्या उज्वला सुरवाडे, रास्तभाव दुकानदार संघटनेचे शत्रृध्न मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी,महिला बचत गटाचे पदाधिकारी, महिला संघटना, विविध शाळेंचे मुख्याध्यापक, प्रकशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अधिक वाचा : धोबी समाजासह इतर लहान समाजाला आरक्षण कधी देणार? प्रतिनिधींचा प्रश्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola