युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाचा (यूआयडीएआय) हेल्पलाईन क्रमांक मोबाईलमध्ये ऑटोसेव्ह होऊ लागला आहे. त्यामुळे अनेकांनी हा सायबर हल्ला असल्याचे म्हटले होते. तसेच हा आधार हेल्पलाईन नंबर आपण सेव्ह केला नसल्याचे युआयडीएआयने स्पष्ट केल्यानंतर हॅकर्सनी डेटा चोरीसाठी असे केले असल्याचीही चर्चा सुरु होती. यावर गुगलने हॅकर्सनी नव्हे तर आपणच नंबर सेव्ह केला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणाचाही डेटा चोरी झाला नसून भिती बाळगण्याचे कारण नसल्याचे गुगलने सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून 18003001947 असा आधार हेल्पलाईन नंबर अचानक कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दिसू लागला. त्यानंतर हा नंबर हॅकर्सनी सेव्ह केला असल्याचेही म्हटले जात होते. मात्र, गुगलने सुरुवातीलाच २०१४ मध्ये त्यांच्या सेटअप विझार्डमध्ये आधार क्रमांक समाविष्ट केला होता. फोन बदलल्यानंतरही तो नव्या फोनमध्ये ट्रान्सफर होतो असे गुगलने सांगितले आहे. आधारच हेल्पलाईन नंबर २०१४ मध्ये OEM (स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांना दिला जाणारा प्रोग्रॅम) ना दिला होता. स्मार्टफोनसाठी ॲड्रॉइड ही ऑपरेटींग सिस्टीम गुगलने तयार केली आहे. याचा वापर स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्ये केला जातो.
गुगलने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, २०१४ मध्ये भारतातील स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांना दिलेल्या सेटअप विझार्डमध्ये आधारचा हेल्पलाईन क्रमांक आणि आपत्कालिन मदत क्रमांक ११२ यांचा समावेश केला होता. तेव्हापासून हे नंबर फोनमध्ये सेव्ह होत आहेत. यामुळे काही समस्या निर्माण झाली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच यामुळे कोणाचाही फोन, डिव्हाईस अनधिकृतपणे वापरले नसून हा नंबर डिलिट करता येत असल्याचेही गुगलने सांगितले.
नव्या अपडेटमध्ये सध्याच्या त्रुटी काढून टाकल्या जातील. येत्या काही आठवड्यांमध्ये स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांना नवीन सेटअप विझार्ड उपलब्ध करुन दिले जाईल असे गुगलने स्पष्ट केले.
गुगल अकाऊंट
स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाला इमेल द्यावा लागतो. त्यावर सपंर्क क्रमांक मेलला जोडता येतात. यामुळे आपण फोन आणि सिमकार्ड जरी बदलले तरी गुगल अकाऊंटवरुन सर्व संपर्क आपल्याला नव्या फोनमध्ये घेता येतात.
आयफोनमध्येही नंबर सेव्ह
आयफोन आयओएस वर चालतात तर त्यामध्ये आधार नंबर कसा सेव्ह झाला असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्यांनी आयफोन वापरण्यापूर्वी ॲड्रॉईड फोन वापरले आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आधीच ॲड झालेला नंबर फोन बदलल्यानंतर दुसऱ्या फोनमध्येही ट्रान्सफर झाला.
नंबर लगेच डिलीट करा
18003001947 हा क्रमांक ज्याच्या मोबाईलमध्ये ऑटोसेव्ह झाला असेल, त्यांनी तो तातडीने डिलिट करावा, असा सल्लाही सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, मोबाईलमध्ये जो क्रमांक सेव्ह झाला आहे, तोही चुकीचा आहे. 18003001947 हा क्रमांक दोन वर्षांपूर्वीच बंद झाला असल्याचे युआयडीएआयने स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा : भारतात लॉन्च झाले ब्लॅकबेरी चे हे स्मार्टफोन्स– Evolve आणि Evolve X
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola