रेल्वे विभागातील सहायक लोको पायलट आणि तंत्रज्ञ भरतीसाठी अर्ज करणाऱ्या ४७.५६ लाख उमेदवारांसाठी खुशखबर आहे. सरकारच्या वतीने २६,५०० पदांची वाढ करण्यात आली असून आता ६० हजार पदांची भरती होणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी टि्वटद्वारे ही माहिती दिली. रेल्वे विभागात नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.
Govt. has more than doubled the vacancies for Assistant Loco Pilot & Technician posts from 26,502 to 60,000, ensuring more jobs in Railways.
सरकार ने सहायक लोको पॉयलट व तकनीशियन पदों को दोगुने से अधिक कर 26,502 से 60,000 किया, इससे रेलवे में और अधिक नौकरियां सुनिश्चित हुई। pic.twitter.com/qF9w2SSkcV— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 2, 2018
अजमेर येथील रेल्वे भरती मंडळाचे अध्यक्ष आलोककुमार मिश्र म्हणाले की, रेल्वे मंडळाच्या वतीने ९ ऑगस्टला संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे विभागाच्या वतीने उमेदवारांना परीक्षा कुठल्या शहरात असेल याची माहिती दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सध्या हॉलतिकीट जारी केलेले नाहीत. उमेदवार ५ ऑगस्टला हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतील. परीक्षेेत ७५ प्रश्न असतील. पहिल्या टप्प्यात २६ जुलैपासून ऑनलाइन मॉक टेस्टची लिंक अॅक्टिव्ह केली आहे.
हेही वाचा : मराठा आरक्षण: महाभरतीमध्ये मराठा समाजातील तरूणांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस