फॉर्च्युन च्या यादीत भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑईल कॉरर्पोरेशन (आयओसी)ला सर्वात वरचे स्थान मिळाले आहे. आयओसीचा गेल्या वर्षाचा निव्वळ नफा २३ टक्क्यांनी वाढून तो ६५.९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. या कामगिरीच्या जोरावर कंपनीने २०१७ च्या १६८ व्या स्थानावरून यंदा १३७व्या स्थानी झेप घेतली आहे.
फॉर्च्युन च्या यादीत भारतातील दुसरी कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज होय. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या कंपनीचा मुख्य कारभार तेल आणि गॅस असला तरी रिलायन्स जिओच्या माध्यमातून त्यांनी दुरसंचार क्षेत्रात देखील मोठी मजल मारली आहे. भारतातील ही पहिली खासगी कंपनी आहे ज्याला फॉर्च्युन यादीत स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी २०३ क्रमांकावर असलेल्या रिलायन्सने यंदा १४८व्या क्रमांक झेप घेतली आहे.
आयओसी आणि रिलायन्स पाठोपाठ ओएनजीसीने या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे २०१७च्या यादीत या कंपनीचे नाव नव्हते. पण यंदा ओएनजीसीला १९७वे स्थान मिळाले आहे. तर भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक २१६व्या स्थानी आहे.
टाटा ग्रुपमधील टाटा मोटर्स ही कंपनी २३२व्या तर भारत पेट्रोलियम कॉर्प ३१४व्या स्थानी आहे. या यादीतील सातवी भारतीय कंपनी म्हणजे राजेश एक्सपोर्ट्स होय. फॉर्च्युन च्या यादीत ही कंपनी ४०५व्या स्थानी आहे.
सर्वाधिक नफा कमवणाऱ्या यादीत रिलायन्सने जागतीक कंपन्यांमध्ये ९९वे स्थान मिळवले आहे. यादीत पहिल्या १० कंपन्यांमध्ये चीनमधील ३ कंपन्यांचा समावेश आहे. वॉलमार्टनंतर स्टेट ग्रिड दुसऱ्या तर सिनोपेक ग्रुप तिसऱ्या स्थानावर आहे.
फॉर्च्युन ने दिलेल्या माहितीनुसार जगातील ५०० सर्वात मोठ्या कंपन्यांनी २०१७मध्ये १९ हजार अब्ज डॉलरची उलाढाल केली होती. यंदा या कंपन्यांनी ६.७७ कोटी लोकांना रोजगार दिला आहे.
अधिक वाचा : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत