शेतात प्रात्यक्षिक करून जिल्हाधिकारी यांनी फेरोमॅन डे केला साजरा
अकोला, दि. 1 :- मागील वर्षी कपाशीवर झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला होता. परंतु बोंडअळीच्या निवारणार्थ कपाशीच्या शेतात फेरोमॅन ट्रॅप लावल्यामुळे नर पतंग त्यांच्याकडे आकर्षित होवून फेरोमॅन ट्रॅप (कामगंध सापळे) अडकतो त्यामुळे कपाशीवर येणा-या प्रादुर्भाव कमी होतो. म्हणून बोंड अळीच्या निवारणार्थ फेरोमॅन ट्रॅप कपाशीच्या शेतात लावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
आज महसुल दिन हा दिन फेरोमॅन दिन म्हणून साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले असून प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील शेतक-यांना बोंडअळी निवारणार्थ फेरोमॅन ट्रॅप लावण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कापशी येथील विष्णू वडतकर यांच्या कपाशीच्या शेताला भेट देवून गावक-यांना बोंडअळीच्या निवारणार्थ फेरोमॅन ट्रॅप लावण्याबाबत स्वत: फेरोमॅन ट्रॅप लावण्याचे प्रात्यक्षिक करून शेतक-यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसिलदार विजय लोखंडे, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र शास्त्री, कापशीचे सरपंच अंबादास उमाळेसह शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले की, बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यापुर्वी उपाययोजना म्हणुन फेरोमॅन ट्रॅपचा वापर करावा . यामुळे असलेल्या विशिष्ट प्रकारच्या वासामुळे नर पतंग आकर्षित होतो. व ट्रॅपमध्ये अडकतो. एका नर पतंगाचा मादी पतंगाशी संयोग होवून सुमारे 300 अंडे एकाच वेळी टाकल्या जातात. संयोगाच्या अगोदरच नर पतंग फेरोमॅन ट्रॅप मध्ये अडकल्यास या प्रक्रियेला आळा बसतो. व अंडी देण्याची प्रक्रिया थांबते. व बोंडअळीचा प्रादुर्भाव होत नाही. असे त्यांनी सांगितले.शेतक-यांनी रोज सकळी शेतात जावून फेरोमन ट्रॅप मध्ये किती पतंगा अडकले याची पाहणी करावी ते पतंग नष्ट करावे, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्यात.
बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतात दिसल्यास कृषि विभाग तसेच कृषि विदयापीठाच्या सल्लयानुसार किटकनाशकाची फवारणी करावी. या भागातील कृषि सहायक यांनी शेतात जावून फेरोमॅन ट्रॅप बसविण्याची कार्यवाही येत्या दोन-तीन दिवसांत पुर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विष्णू वडतकर यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यावेळी कृषि अधिकारी नरेंद्र शास्त्री यांनी सोयाबीनवर काही ठिकाणी चक्रभुंगा किड व तंबाखुजन्य अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले. श्री .शास्त्री यांनी या किडीबाबत कोणते किटक नाशकाची फवारणी करावी याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शेतक-यांनी शेतावरच शेती सोबत कुक्कुट पालनासारखा पुरक व्यवसाय करावा यामुळे आर्थिक उत्पनात भर पडून शेतातील पिकांवर येणा-या किडी व अळीचा नायनाट होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या फळबाग लागवड या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेवून शेतक-यांनी फळबाग लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कापशीचे सरपंच अंबादास उमाळे यांनी कापशी परिसरातील 50 शेतकरी एकत्र येवून सिताफळ या फळ पिकाची लागवड करणार आहेत. या साठी शासनाने सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिताफळाची रोपे उपलब्ध करून दयावी तसेच रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड करणा-या शेतक-यांना शासनाची मदत मिळवून दयावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतक-यांकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आला तर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. फळबाग लागवडीतुन उत्पादन झालेले फळपिकाला वावर च्या माध्यमातून बाजार पेठ उपलब्ध करून देण्यात येईल तरी शेतक-यांनी फळबाग लागवड क्षेत्रात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कापशी गावाचे कृषि सहायक अभया राऊत, तलाठी वंदना चौधरी , ग्रामसेवक मधुशिला डोंगरे , मंडळ अधिकारी सुरेश शिरसाठ , गोरेगाव बु. तलाठी राहूल शेरेकर, चिखलगावचे तलाठी स्वाती माळवे, माझोडचे तलाठी ज्योती कराडे, गोरेगावच्या तलाठी आर.एच. घुगेसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.