अकोला- वऱ्हाड अन सोन्याची कुऱ्हाड अशी म्हण राज्यात प्रचलित असलेल्या हा भाग आता पार काळोखात बुडाला आहे,त्याची ओळख हरवून बसला आहे. आता ही ओळख शेतकरी आत्महत्याग्रस्त वऱ्हाड म्हणून होत आहे हा आम्हा वऱ्हाडी लोकासाठी चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
शनिवारी नागपूर च्या श्रीमंत धनवटे सभागृहात आयोजित वऱ्हाडाची कैफियत या कार्यक्रमात आपल्या व्याख्यान व पावर प्रेझेंटेशन द्वारे सांख्यिकी विभागाचे प्रमुख अकोल्याच्या शिवाजी महाविद्यालयाच्या डॉ संजय खडक्कार या प्राध्यापकानी सर्वांचे डोळे उघडून दिले. या समस्येवर जनमंच चे अध्यक्ष प्रा शरद पाटील यांनी खऱ्या अर्थाने वाचा फोडली, कधी नव्हे ते नागपूरच्या वृत्तपत्रकारांनी याची दखल घेऊन वऱ्हाडाचा विकासाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
महाराष्ट्रच्या इतर भागाच्या तुलनेत तर सोडा अगदी पूर्व विदर्भाच्या तुलनेत देखील पश्चिम विदर्भ किती मागासला आहे याची आकडेवारी सुन्न करणारी आहे.लोकसंख्येच्या प्रमाणात नागपूर आणि अमरावती विभाग सारखा असला तरी जलसिंचन, कृषिपंप,वीज वितरण,आय टी पार्क,या संबंधी अर्ध्यावरच विकास असून नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात रोजगाराचे प्रमाण कमी आहे पूर्व भागात अडीच लाख नोकऱ्या तर पश्चिम भागात फक्त एक लाख चौदाहजार नोकऱ्या उपलब्ध आहेत.पूर्व भागातील गुंतवणूक ही पंधरा हजार कोटी तर पश्चिम भागातील गुंतवणूक ही मात्र सात हजार कोटी या पटीत आहे.
मेडिकल च्या बाराशे जागा पैकी नऊशे जागा ह्या नागपूर विभागात तर तीनशे जागा फक्त अमरावती विभागात आहेत या व्यतिरिक्त आय आय टी, ट्रिपल आयटी, एम्स,ला असे राष्ट्रीय पातळीवरील महाविद्यालय नागपुरात आहेत मात्र डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सोडले तर वऱ्हाडातील एकही इन्स्टिट्यूट आम्हाला दाखवण्या सारखे नाही.
येथील संघटना,राजकीय पक्ष,पुढारी,लोकप्रतिनिधी, प्रशासन या सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार केला नाही तर आमचे काही खरे नाही अंधार वाटा आमच्या दारावर कडी वाजवत आहे या साठी सावधान व्हा, मी तर म्हणतो वऱ्हाडातील सर्व जिल्ह्यात विविध संघटनांनी डॉ खड्क्कर यांचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ठेवले पाहिजे ती काळाची गरज आहे.
अधिक वाचा : आमदार श्री प्रकाशभाऊ भारसाकळे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ३ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम चे आयोजन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola