अकोला (प्रतिनिधी)- अकोला जिल्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून आज बाळापूर भूमिअभिलेख कार्यालयातील दोघांना तर अकोट येथे कर्तव्यावर असलेल्या एकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
बाळापूर भूमिअभिलेख कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या दोघांना आज लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून रंगेहाथ पकडले.एका शेतकऱ्याच्या शेतीच्या मोजणी दस्तावर सही केल्याचा मोबदला म्हणून बाळापूर भूमीअभिलेख कार्यालयातील परशराम संभाजी इंगळे वय ४४ भूमापक व विजय सखाराम गवई वय ३९ लिपिक यांनी १५०० रुपयांची मागणी केली होती तर अकोट येथील भूमिअभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार अब्दुल लतीफ पांडे वय ५६ याने तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले.त्यावरून आज बाळापूर येथे सापळा रचून या तिन्ही लाचखोर बहाद्दरांना अटक करण्यात आली.सदर कारवाई अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पो नि चव्हाण,पो हे कॉ दामोदर,सुनील राऊत,राहुल इंगळे,सुनील येलोने, खडसे यांनी केली.
अधिक वाचा : अडगाव बु. चुनार पुरा भागातील समस्या दूर करा- एम आय एम ची मागणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola