अडगाव बु(गणेश बुटे)– ग्राम पंचायत अडगाव बु मधील चुणार पुरा भागाला अनेक समस्यांनी ग्रासले असून नागरिकांना होणारा त्रास बघता येत्या तीन दिवसात समस्या सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा एम आय एम अडगाव बु शाखे तर्फे देण्यात आला आहे.
स्थानिक चुणार पुरा भागाला अनेक समस्यांनी ग्रासले असून स्वच्छेतेचे तीन तेरा वाजले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राम पंचायत ला निवेदन देऊन सुद्धा कुठलेच पाऊल ग्राम पंचायत कडून उचलले गेले नसल्याने येत्या तीन दिवसात समस्या सुटल्या नाही तर ग्राम पंचायत मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मो असलम उल्हाह मो आरिफ यांनी दिला.
हेही वाचा : शेतकऱ्याला याेग्य भाव मिळाला नाही; कृषी उत्पन्न बाजार समितीने एकाचा अडत परवाना निलंबित