२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत १०० टक्के व्ही.व्ही.ए.पी.टी. मशीनचा उपयोग केला जाईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. आयोगाने म्हटलेय की, निवडणुकीसंदर्भात १६.१५ लाख नवीन मशीनची खरेदी प्रक्रिया पूर्ण होत आहे. तसेच मशीनच्या उत्पादन आणि पुरवठ्याचाही आढावा घेण्यात येत आहे, असे आयोगाने स्पष्ट केलेय.
मशीनचा पुरवठा हा धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे १०० ०० टक्के व्ही.व्ही.ए.पी.टी. मशीनचा उपयोग करण्याचा दावा कसा पूर्ण होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.निवडणूक प्रक्रिया अधिक पारर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत.
निवडणूक पूर्णपणे पारदर्शी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरुवातीला ई.व्ही.एम्. वापरण्यास प्रारंभ केला होता. यानंतर, व्ही.व्ही.ए.पी.टी. मशीन म्हणजेच व्होटर-वेरिअरिंग पेपर ऑडिट ट्रेल देखील ई.व्ही.एम.मध्ये स्थापित केले गेले आहे. या यंत्रास मतदान केल्यानंतर मतदाराला एक स्लिप मिळते, ज्यामध्ये ज्या मतदाराने मतदिले आहे ते योग्य उमेदवारांना गेले आहे की नाही, याची एक पावती किंवा स्लीप आहे.
गेल्या वर्षी १०० टक्के व्ही.व्ही.पी.ए.टी. मशीन पुरवण्यासाठी मे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची अंतिम मुदत निश्चित केली होती. निवडणूक आयोगाने मे.न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात म्हटले होते की, व्ही.व्ही.पी.ए.टी. मशीन्स २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्णपणे वापरण्यात येतील.
व्ही.व्ही.पी.ए.टी. मशीन्ससाठी, ई.सी. ने हैदराबादमध्ये स्थित बंगळुरु इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेड (बी.ई.एल.) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बरोबर करार केला होता. या करारा अंतर्गत या दोन्ही कंपन्यांना सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगाला १६.१५ लाख मशीन पुरवण्याची आवश्यकता आहे. पण सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत फक्त ४ लाख मशीन पुरविण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा : अकोट मध्ये बंद न ठेवता सकल मराठा समाजाने काढला भव्य कँडल मार्च