अडगाव बु(गणेश बुटे)– तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु.प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक दिवसा पासून रूग्णाना कोणत्याही प्रकारचे औषध मिळत नसल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत नाराजी व्यक्त होत आहे तर औषधोपचाराकरिता रूग्णांना खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागत आहे.अडगाव बु.प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना आपल्या आरोग्य केंद्रात औषधी नाहीत हे माहिती असुन सुद्धा औषधी उपलब्ध करण्यात असमर्थता दाखवित आहेत तर दुसरीकडे याच प्राथमिक आरोग्य केंद्रात काही कर्मचारी यांच्या मर्जीतील नागरिक आरोग्य केंद्रात आल्यास त्यांना निवासस्थानामधुन औषधे मिळत आसल्याचे रुग्णा मध्ये चर्चा आहे तरी या आरोग्य केंद्रात चालत असलेला हा प्रकार थाबवावा आशि मांगणी होत आहे.