अकोला : संततधार पाऊस व आषाढी एकादशी असुनही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज सोमवार दि. 23 जुलै 2018 रोजी झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 90 तक्रारी प्राप्त झाल्या. विशेष म्हणजे स्वत: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन तक्रार घेऊन आलेल्या उपस्थित नागरिकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्वीकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही दिला.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम, राकेश कलासागर, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उदयसिंह राजपूत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेद्र निकम, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 90 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्वीकारण्यास सुरुवात केली.
विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग – 30 तक्रारी, पोलीस विभाग—09, जिल्हा परिषद– 16, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था -05, महानगर पालिका– 12, अग्रणी बँक – 02, विद्युत विभाग –03 भूमी अभिलेख – 03, कृषी विभाग – 03 , जात पडताळणी समिती – 02, सार्वजनिक बांधकाम विभाग -01, सहायक आयुक्त समाज कल्याण -01, जिल्हा शल्य चिकित्सक- 01, दुय्यम निबंधक -01, बि.एस.एन.एल. विभाग – 01 अशा एकुण 90 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.
अधिक वाचा : ए.आय.एम.आय.एम तर्फे अडगाव बु येथे मुस्लिम कब्रस्तान येथे वृक्षारोपण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola