तेल्हारा दि :- तेल्हारा तालुका क्रीडा संकुलची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता संबधित अधिकारी व पदाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी क्रीडा प्रेमी तरुणांनी 23जुलै ला भरपावसात क्रीडा संकुल वर श्रमदान करून धावपट्टीवरील गवत काढन्याला सुरुवात करून साफसफाई केली.
तेल्हारा तालुक्यातील शहरामधील तालुका क्रीडा संकुल चे काम अनेक वर्षा पासून कासव गतीने सुरु आहे त्यामुळे क्रीडा क्षेत्रात तरुणांना वाव मिळू शकला नाही तसेच , पोलीस भरती , सैनिक भरती मध्ये शारीरिक चाचणी सराव करण्याकरिता तालुका क्रीडा संकुल मध्ये आवश्यक असलेल्या सुविधा धाव पट्टी , गोळाफेक , लांब उडी , उंच उडी ,सिंगल बार , डबल बार , आवर भिंत, विद्युत व्यवस्था उपलब्ध नाहीत. तसेच क्रीडा संकुल मधील धाव पट्टी ची सुद्धा अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे युवक व युवतींना नाईलाजस्तव शहरातील रस्त्या वरून धावावे लागते. त्यामुळे अनेक युवकांचे अपघात झालेले आहेत. तरी क्रीडा संकुल मधील धाव पट्टी प्राधान्याने दुरुस्थ करून तरुणांना धावण्या करिता विना विलंब उपलब्ध करून द्यावी तसेच इतर सर्व सोयी युक्त क्रीडा मैदान उपलब्ध करून द्यावे व क्रीडा संकुल मध्ये बाधण्यात आलेला बॅट मिंटन हॉल, व्यायामशाळा मध्ये साहित्य उपलब्ध करून देण्या बाबत मांगणी करून सुध्दा अधिकारी यांनी दखल न घेतल्या मूळे क्रिडा प्रेमी तरुणांनी 23 जुलै ला सकाळी संततधार पाऊस सुरु असतांना सुध्दा भरपावसात श्रमदान करून धावपट्टी वरील गवत काढून साफसफाई केली.
अधिक वाचा : व्हिडिओ ब्रेकिंग न्युज : तेल्हारा पोलीसांची मोठी कारवाई ,मध्यप्रदेशातील विदेशी दारू व मोटर सायकल सह आरोपीला अटक
यावेळी रामभाऊ फाटकर, सचिन थाटे, किशोर डामरे, राम वाकोडे, सागर निर्मल, अमोल अकोटकार, कृष्णकांत वायकर निखील मस्तूद, अनिकेत बकाल, शिवा खारोडे, निखील मस्तूद, निखील वानखडे, चेतन चव्हाण, प्रफुल खोडे, अमोल वानखडे, कुणाल देशमुख, आकाश पवार, गणेश घ्यार, मोहन पिंपळे, स्प्नील माठे, निलेश गावात्रे, अंकित गावात्रे, स्वप्नील कुयटे, प्रफुल चव्हाण, रामेश्वर खाडे, आकाश कौतकार, रोषण कुयते, शामल पवार, शबीर शाह, योगेश काळे, शुभम चव्हाण, बंटी गायकवाड, योगेश सरदार, इत्यादी क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola