अकाेला – ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या (AIMTC) नेतृत्वाखाली मालवाहतुकदारांनी पुकारलेले देशव्यापी चक्काजाम आंदोलन अाणखी तीव्र हाेण्याचे संकेत प्राप्त झाले असून, या अांदाेलनात दाेन दिवसात फळ व भाजीपाला वाहतुकीचा समावेश हाेणार अाहे. भाजीपाला व फळ वाहतुकीला ब्रेक लागणार असल्याने भाव कडाडण्याची शक्यता अाहे.
सुरुवातीला अांदाेलनातून जीवनावश्यक वस्तूची वाहतूक वगळण्याचा निर्णय अांदाेलकांनी घेतला हाेता. मात्र, अाता अांदाेलनाच्या पुढील टप्प्यात भाजीपाला व फळ वाहतुकीचाही समावेश करण्यात येणार अाहे. तसेच शनिवारी दुपारी जुने शहरातील बायपास येथे मालवाहतूकदारांनी रास्ता राेकाे अांदाेलन केले. त्यामुळे वाहतुकीची काेंडी झाली हाेती, त्यामुळे मार्गावर वाहनांची रांगच लागली हाेती. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
तृतीय पक्ष विमामध्ये न परवडणारी व असहनीय, अपारदर्शक झालेली वाढ ही अाणखीनच संकटात टाकणारी अाहे. ई-वे बिलिंग पद्धत ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकांना परवडणारी नाही. त्यामुळे चक्काजाम अांदाेलन करण्यात येत असल्याचे असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे.
३०० टक्के वाढ: तृतीय पक्ष विमा (थर्ड पार्टी इन्शूरंस) प्रिमियममध्ये ३०० टक्के वाढ झाली. त्यामुळे प्रिमियमसाठी कर्ज काढावे लागणार अाहे. याबाबत यंत्रणा व कंपन्यांकडे दाद मागण्यात अाली. यावर क्लेम देण्यासाठी खूप पैसा खर्च हाेत असल्याचे सांगण्यात अाले. मात्र, केवळ ९६ टक्केच अपघात ट्रकचे हाेत असतानाही क्लेमचा मुद्दाच नाही. अशातच जीएसटीचाही बाेझा अाहे. एजंटांचे कमिशन वाढवण्यात अाले. वेळाेवेळी दुष्काळासह इतरही सेसही वाढण्यात येताे. या सर्वांचा फटका ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकांना बसत असून, याबाबत सरकारशी चर्चा करूनही काहीच फायदा न झाल्यास अांदाेलनाचे अस्त्र उगारावे लागणार असल्याने असाेसिएशनतर्फे सांगण्यात अाले.
टाेल व्यवस्थाच अमान्य: टाेल व्यवस्थाच अमान्य असल्याचे असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. टाेल वसूल केल्यानंतर तेथे सुविधा मिळत नाहीत. अपघात झाल्यास वाहन सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी क्रेनची व्यवस्था हाेत नाही. वाहन मालकालाच पैसे खर्च करून क्रेनची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे टाेल पद्धतीच बंद करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
इंधनाचे दर समान हवे :देशभरात डिझेलचे दर एक समान असणे अावश्यक अाहेत, अशी मागणी असाेसिएनशच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. बाजूला असलेल्या कर्नाटकसारख्या राज्यात इंधनाचे दर महाराष्ट्राच्या तुलनेने कमी अाहेत. तसेच राेज इंधनाची दर वाढ न करता सहा महिन्यातून एकदा दराबाबत निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
व्यवसाय परवडेना: मालवाहतुकदारांनी पुकारलेल्या अांदाेलनात अाता फळ व भाजीपाला वाहतुकीचा समावेश हाेणार असल्याच्या वृत्ताला अकोला डिस्ट्रिक्ट गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मजहर खान व सचिव जावेद खान यांनी दुजाेरा दिला. अाता फळ व भाजीपाल्याची वाहतूक करण्यात येणार नसून, लवकरच त्याचे परिणाम दिसू लागतील, असे मजहर खान म्हणाले.
येथे जाणवताेय परिणाम…
१. अकाेल्यात दाल मिल उद्याेग असून, अकाेल्यातून विविध जिल्ह्यांमध्ये किमान १०० ट्रक डाळ पाठवण्यात येते. अांदाेलनाचा फटका दाल मिल उद्याेगाला बसल्याचे उद्याेजकांचे म्हणणे अाहे.
२. अकाेल्यात किराणा बाजारात काेट्यवधींची उलाढाल हाेते. राेज १२० पेक्षा जास्त ट्रक किराणा घेऊन बाहेरील जिल्ह्यात जातात. मात्र, अांदाेलनामुळे किराणा बाजारातून मालाची वाहतूक ठप्प अाहे.
३. जिल्ह्यातून सर्व प्रकारचे ८०० ट्रक जातात. एकावर किमान २० कामगारांच्या हाताला काम मिळते. अांदाेलनामुळे कामगारांच्या हाताला कामच नसून, चक्काजाम काही दिवस सुरु राहिल्यास घरची चूल कशी पेटवावी, असा प्रश्न कामगारांना पडला अाहे.
४. वाशीम बायपास, शिवणी-शिवर, दीपक चाैक, रेल्वे स्टेशन परिसरात मालवाहतूक करणाऱ्या वाहन दुरुस्तीची गॅरेज अाहेत. मात्र, मालवाहतूकदारांच्या अांदाेलनाचा लवकरच दुरुस्तीच्या व्यवसायावरही जाणवणार अाहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola