तेल्हारा(प्रतिनिधी)-तेल्हारा शहरातील गौतमा नदीच्या पुलाजवळील गड्डे भूजवन्यासाठी जनतेकडून व विद्यार्थ्यांकडून सतत मागणी होत आहे तरी पण न.प. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे . पावसामुळे पाणी साचत असल्याने ते खड्डे दिसत नाही, त्यामुळे लहान मुले व विध्यार्थी या खड्यात पडून जखमी सुद्धा झाले तरीसुद्धा न.प.ला जाग न आल्यामुळे व एखादा मोठा अपघात होऊन कुणाचा मृत्यू होऊ नये म्हणून खड्डे भूजवन्याबाबत न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली परतू नगराध्यक्षांनी जनतेप्रती सहानुभूती न दाखवता उलट बिनबुडाचे आरोप करून प्रेस नोट काढून आमचा आवाज दाबण्याचा केवीलवाना प्रयोग केला.
तेल्हारा न.प.अध्यक्षा सौ. जयश्रीताई फुंडकर यांनी म्हटले कि आम्ही आंदोलन केले त्या येथे प्रथम खोट्या बोलल्या आंदोलन करणे व निवेदन देणे यात फरक असते हे त्यांनी समजुन घ्यावे. दुसरे म्हणजे ज्या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत निवेदन दिले तो रस्ता अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार नगर परिषदच्या मालकीचा नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे असे त्याचे म्हणने असेल तर आता पर्यंत न.प.च्या वतीने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे बांधकाम नगर परिषदने का केले.? या रस्त्याचे बांधकाम बांधकाम विभागाला का करू दिले नाही ? या रस्त्यावर LED लाईट बसवण्याची परवानगी काढण्यात आली आहे का ? सदर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे तर रस्त्याच्या आजू बाजूला असलेल्या नाल्यांचे बांधकाम का केले ? या प्रश्नांचे सुशिक्षित नगरअध्यक्षांनी उत्तर द्यावे .भा.ज.पा. नगर सेवकांचे काम नगराध्यक्षांकडून होत नसल्याने त्यांनी आमच्या निवेदनावर सह्या केल्या. नगराध्यक्षांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून केलेले विनबुडाचे आरोप आम्ही फेटाळत आहोत. कुणाचा अभ्यास कच्चा आहे हे यापुढे जनता ठरवणार. खड्डे भूजवायाचे आंदोलन कसे आहे हे आम्ही दाखवून देऊ.
असे मि प्रसिद्धीपत्रकात भाजयुमो तालुकाध्यक्ष सतिष जयस्वाल यांनी जाहीर केले.