अकोट (सारंग कराळे) – अकोट शहरातील अकोट नगर पालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 देशमुख प्लॉट मधील जेतवन नगर आदर्श नगर सुमारे 30 वर्षापासुन सुमारे 3 हजार वस्ती असलेले दलीत बहुल वस्ती आहे. परंतु शासकीय योजना पासुन आजही कोसो दुर आहे.
नगर पालीकेचे हलगर्जी पणा मुळे व राजकीय महत्वाकांक्षा नसल्यामुळे स्थानिक नागरीकाना अनंत यातना सहन कराव्या लागत आहेत सर्वात जास्त ञास होत तो तेथे शिक्षण घेणारा विद्यार्थ्याना होत आहे त्यानां रोज चिखल तुडवत जाणे येणे करावे लागत असुन त्यात भर पडली ती रेल्वचेे बॉर्डगेज कामाची काम चालु असल्यामुळे येथील नागरीकाच्या होत असलेल्या ञासात आणखी भर पडली असुन याकरीता रेल्वे ठेकेदारानाकडे तात्पुरती रस्ताबाबत मागणी केली असता आम्हाला काहीच घेणे देणे नसल्याचे बोलत ठेकेदाराने हात वर केले आहे.
त्यामुळे स्थानिक नागरीकात रेल्वे प्रशासनाबदल रोष निर्माण होत आहे येथे तर दुसरी कडे नगर पालिकेने सुविधेच्या नावावर रमाबाई घरकुल योजनेत अल्पसे घरकुल दिले खरे पण आजही शेकोडो जण प्रतिक्षेत आहेत न रोड आहेत न नाली न नळ कनेक्शन दोन कुपनलिका आहेत त्या पण नादुरुस्त झाल्यास नागरीकानाच स्वखर्चातुन खर्च करावा लागतो.
न. पा. च्या वतीने एकही मुलभुत सुविधा नसुन दलीत वस्ती असताना दलीत वस्तीला ज्या सुविधा मिळायला हव्या त्यापैकी एकही मिळत नसुन रस्ते. नाल्या. लाईट. पाणी. सारख्या प्रश्न मार्गी लागत नाहीत येथे राहणारे जास्तीत जास्त मजूर वर्ग आहे त्याचा फायदा फक्त राजकीय नेते 5 वर्षातुन एकदाच येतात विकास महर्षि आमदार भारसाकळे साहेबानी यानीं रोड बनवायचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही ते हवेेतच आहे नगरसेवक आहेत खरें परंतु न. पा. सत्तेत नसल्यामुळे लोकाचे कामे मार्गी लागत नाहीत त्यामुळे त्याना सुद्धा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
आज पर्यत येथील नागरीकाना मोठ मोठे आश्वासन देऊन राजकीय नेत्यानी ऊपयोग करुन घेतला आहे परंतु आता राजकीय लोकांनी त्याना गुहीत धरुन राजकीय पोळी छेकणार्याना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे तेथील नागरीक बोलत आहेत जो कोणी रस्तासह मुलभुत सुविधा व दलीत वस्तीचा हक्क मिळवुन देईल.
तसेच रेल्वे प्रशासन कडे स्थानिक नागरीकाची दोन दशका पासुन कायमस्वरुपी रोडची मागणी अद्यापही अपूर्णच आहे ते मार्गी लावण्याकरीता व नगरातीला सर्व समस्या नगर पालीका अकोटने लवकरात लवकर न सोडवल्यास मोठे आदोंलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरीकानी दिला आहे
अधिक वाचा : तेल्हारा शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे त्वरित बुजवा अन्यथा आंदोलन-भाजयुमो चा ईशारा