आझमगड – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना आपला लोकसभा मतदार संघ वाराणसीला पोहोचले. येथून त्यांनी सर्वात आधी आजमगड दौरा केला. येथेच त्यांनी 354 किमी लांब अशा ईशान्य एक्सप्रेस-वेचा पाया रोवला. यानंतर पीएम मोदींनी आपल्या भाषणात बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी ट्रिपल तलाकचा मुद्दा छेडला. तीन तलाकच्या मुद्द्याने विरोधी पक्षाची मूठ उघडली आहे. केंद्र सरकार महिलांच्या कल्याणासाठी काम करत आहे. तर हे पक्ष त्यांना संकटात टाकण्याचे काम करत आहेत. जगभरातील मुस्लिम देशांमध्ये सुद्धा ट्रिपल तलाकवर बंदी आहे.
राहुल गांधींना सवाल…
मोदी म्हणाले, “मी एका दैनिकात वाचले होते की काँग्रेस अध्यक्ष श्री अमुम म्हणतात की काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे. मनमोहन सिंग सुद्धा म्हणाले होते, की देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे. मी अमुकांना विचारतो, की त्यांच्या पक्षात मुस्लिम महिलांना स्थान तरी आहे का?”
काही पक्ष केवळ कौटुंबिक पक्ष
मोदी पुढे म्हणाले, “काही राजकीय पक्ष डॉ. बाबा साहेब आंबेडकर आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नावावर फक्त राजकारण करत आहेत. या पक्षांनी जनतेचा किंवा गोर-गरीबांचा नाही तर स्वतःचा विकास केला आहे. मते गरीब आणि दलितांकडून मागितले. मग सत्तेवर येऊन आपल्याच तिजोऱ्या भरल्या. आपण पाहू शकता की जे लोक एकमेकांचे तोंड सुद्धा पाहू इच्छित नव्हते ते आता सोबत आहेत. सगळेच घराणेशाहीचे पक्ष एकत्रित येऊन विकासात अडथळा ठरत आहेत.