अवर अकोला इफेक्टअकोट (सारंग कराळे)-स्थानिक अकोट मधील प्रभाग क्रमांक 7 चे नागरीक व युवा नगरसेवक तथा न पा चे शिवसेनेचे गट नेते मनीष कराळे याच्या नेतुत्वात मुख्याधिकारी प्रशांत खोडे व नगराध्यक्ष याच्याकडे सामान्या सुविधा सुद्धा न पालीका कडुन मिळत नसल्याची तक्रारी केल्या आम्ही कर स्वरुपात नगर पालीकेला कर भरत असुन तरी सुद्धा नगर पालिकेच्या वतीने कुठल्याच प्रकारची सुविधा मिळत नसुन चालण्या करीता रोड सुद्धा नाही विकास महर्षि आमदारानी निवडणुकी पुर्वी ऊदघाटन केलेला रोड अद्यापही झाला नाही त्यामुळे शाळेत जाणार्या विद्यार्थी गटार व पाण्याचे डबके तुडवत जाणे येणे करत आहेत एवढा अनंत यातना होत असल्याच्या तिव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी नगराध्यक्षाना चागंलेच धारेवर वर धरले यावेळी नागरीक व गटनेते व नगरसेवक मनीष कराळे याना मुख्यधिकारी व नगराध्यक्ष यानी लवकरच प्रभागातील रस्ताच्या नव्याने निवेदा काढुन दिड महिन्याच्या आत रस्ताच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी मार्गदर्शक
शिवसेना संपर्क प्रमुख अरविंद सावंत साहेब,मा.आ.गोपिकीशन बाजोरिया,सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, मा.आ.संजय गावंडे,जिल्हाप्रमुख नितीनबाप्पू देशमुख,जिल्हा संघटिका सौ.मायाताई म्हैसने यांच्या मार्गदर्शनात व नगर पालिका अकोटचे गटनेते तथा शिवसेनेचे युवा नगरसेवक याच्या नेतुत्वात करण्यात आले यावेळी प्रभागातील युवासेना तालुका संघटक कुनाल कुलट,युवासेना शहर सरचिटणीस नारायण पोटे,युवासेना उपतालुका प्रमुख अंकुश कुलट,जेष्ठ शिवसैनिक विजू भाऊ ढेपे,धनंजय गावंडे,वैभव जगताप,सागर कराळे,मयूर भगत,तेजा पालेकर,पंकज पालेकर,आकाश शेरेकर,मुन्ना वानखडे,अजय पुरी इ.पदाधिकारी तसेच शिवसैनिक युवासैनिक तथा प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
*( विशेष म्हणजे एक दिवस अगोदर अवर अकोला न्यूज मधे अकोट शहातील नागरीकाना मुलभुत सुविधा मिळत नसल्याची वुत्त प्रकाशीत केले होते )