अकोट प्रतिनिधी(कुशल भगत)- शहरातील येणारा अंजनगाव रोड ते इकरा उर्दू शाळेपर्यंत रस्ता २०१४ मध्ये अकोट न पा कडून अर्धवट बांधण्यात आला होता. त्याचे ही काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. त्यानंतर या भागातील मुस्लिम बांधव अकोट न पा कार्यालयाचे समोर उपोषण वर बसले होते आता
या रस्त्याच्या प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असून तसेच हा रस्ता ३० फुटाचा असून त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून आता पावसाळाचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात नाल्याचे पानी व ओला कचरा साचत असल्याने दूर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. व येणे जाणे खुप कठीण निर्माण झाले आहे जावे तरी कुठून जावे हा प्रश्न निर्माण होत आहे.
या रस्त्यावर ३ ते ४ शाळा व मस्जिद दवाखाना मेडिकल्स आहे आणि शाळाचे विद्यार्थी व लोकांची मोठी पणे रहदारी असते व या रस्त्यावरुन अचानक मय्यतची अंतिम यात्रा गेली असता त्यातील अनेक लोकांच्या अंगावर या रस्त्यावरील चिखल उडाला व पाय सुध्दा जमिनिमध्ये फसले असून लोकांना व नमाज पठण करिता जात असतांना त्यांचे कपड्यावर येणारे जाणारे मोटर सायकलमुळे दूषित पाणी अंगावर उडून वेळप्रसंगी छोटे मोठे वादविवाद सुध्दा या ठिकाणी दररोज निर्माण होत असतात.
त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये या विषयावर गंभीरेने विचार करणे अत्यंत गरजेचे आहे अणि मोठे मोठे खड्डे पडल्याने रात्रीचे वेळात अनेक जणांनी दिसत नसल्याने खड्यावर पड़त असून जखमी सुध्दा होत आहे आता अकोट न पा मधील भाजपा ची अकोट शहर चे जनतेने एक हाती सत्ता निवडून दिली आहे .
तसेच मुस्लिम भागातील अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकरचे काम सुध्दा झाले नाहीत व आता तरी मोठी अपघात होण्याची ची अकोट न पा वाट बघत आहे असल्याचे समजते आणि कोणत्या ही प्रकारचे मुरूम टाकण्यास न पा असमर्थ ठरत आहे एवढेच नव्हे अकोट शहराची जनतेने न पा चे कार्यप्रणाली वर प्रचंड पणे रोष सुध्दा व्यक्त करीत आहे या करिता महाराष्ट्र मुस्लिम युवा प्रतिष्टान अकोट शहर च्या वतीने अकोट न पा चे मुख्याधिका-यांना निवेदन सादर करून या समस्याचे बाबत अवगत केले व तात्काळ या रस्त्यावर मुरूम टाकून नागरिकांनी त्रास्त पासून दूर ना केल्यास या रस्त्यावरचा चिखल न पा मधील टाकणार असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे .
या निवेदन देतेवेळी महाराष्ट्र मुस्लिम युवा प्रतिष्टान चे अकोट शहर अध्य्क्ष रमज़ान शाह हसन शाह विदर्भ अध्य्क्ष जफर खान पत्रकार विदर्भ उपाध्य्क्ष अब्दुल आरीफ उर्फ़ राजा सामाजिक कार्यकर्ता गफूर शाह शब्बीर शाह मो नईम मो कलीम मतीन अहेमद इरफ़ान इनामदार अन्सार भाई अनवर अली चक्कीवाले शफीक पटेल अज़हर शाह इमरान शाह महेबूब् शाह रिज़वान खान अहेमद खाँ रहेमत खाँ गुड्डू भाई अहेमदउल्ला खान कादरी नदीम शाह नज़ीर शाह शेख अनवर गजम्फर भाई एजाज खान सोहेल खान यांचे स्वक्षरी आहेत.
अधिक वाचा : अकोट तालुक्यातील ग्राम कुटासा येथे रानडुक्कराच्या हल्यात इसम जखमी