तेल्हारा (शुभम सोनटक्के)-शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटीयाला भवानी प्रतिष्ठान तेल्हारा येथे शिवसेना तेल्हारा तालुक्याचा वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये प्रामुख्याने उपतालुक प्रमुख जि. प.सर्कल प्रमुख प.स. सर्कल प्रमुख यांची आढावा बैठक तेल्हारा शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी तालुका प्रमुख विजय मोहोड यांनी उपतालुक प्रमुख जि. प.सर्कल प्रमुख प.स.सर्कल प्रमुख यांना प्रत्येक सर्कल मध्ये सर्कल व्हाईस शाखा प्रमुखांच्या बूथ प्रमुखांच्या बैठकी घेऊन आगामी जि. प. व प.स निवडनुकीकरिता प्रत्येक सर्कल प्रमुखाने आपल्या सर्कल ची शंभर टक्के बांधणी करावी येत्या 15 दिवसात आमदार गोपीकिशनजी बाजोरिया साहेब मुंबई येथून अकोट संपर्क प्रमुख भास्करजी ठाकुर अकोला जिल्हाप्रमुख नितीनबाप्पू देशमुख माजी आमदार संजयभाऊ गावंडे जिल्ह्या उपप्रमुख दिलीप बोचे हे अकोट मतदारसंघाच्या पक्षबांधणी करण्याकरता सर्कल व्हाईस बैठकी लावणार आहेत तरी सर्व तालुक्यातील उपतालुक प्रमुख जि. प.सर्कल प्रमुख प.स.सर्कल प्रमुख कामाला लागावे अशे मत तालुका प्रमुख विजय मोहोड यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित उपतालुका प्रमुख संजय आढाउ पुरुषोत्तम गावंडे देवानंद फोकमारे शिवदास कुकडे अजय पाटील गावंडे जि. प.सर्कल प्रमुख विक्की धांडे गणेश तीव्हणे नितीन बाळापुरे ज्ञानेश्वर आखरे रमेश धामोळे प.स.सर्कल प्रमुख प्रवीण वसु धीरज खिरोडकार शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव राम वाकोडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वैष्णव प्रस्तावित विजय पाटील मोहोड यांनी केले