• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

मूर्तिजापूर तालुक्यात संततधार; नदी-नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत

Team OurAkola by Team OurAkola
May 21, 2020
in अकोला जिल्हा, Featured
Reading Time: 1 min read
78 1
0
मूर्तिजापूर
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

मूर्तिजापूर – मूर्तिजापूर तालुक्यात गत तीन दिवसापासुन सुरु असलेला संततधार पाऊस थांबता थांबत नसुन, आज  तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने राजनापूर खिनखीनी, कुरुम, कवठा, मंडूरा, रामटेक, कासारखेड, कार्ली, माना आकोली, सैदापुर, नवसाळ ही गावे पाण्याखाली आली असून सर्वात जास्त नुकसान कुरूम, राजनापूर, खिनखीनी, कवठा, सैदापुर या गावात झाल्याची माहिती असून, ही गावे जलमय झाली आहे.

आतापर्यंत मूर्तिजापूर तालुक्यात आतापर्यंत 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पोही- माना, कवठा – कुरूम या गावा दरम्यान मोठे नाले असल्याने संपर्क तुटला आहे. रात्री उशिरा अचानकपणे उपरोक्त गावांच्या परीसरात पावसाने रौद्ररूप धारण केल्याने गावालगत असलेले अंबर नाला, मोरीमाय नाला, जामठी नाला, सैदापुर नाला, कवठा, खिनखीनी  हे सर्व नाले तुडुंब भरून वाहू लागले.प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी नाल्यातून पुढे जात नव्हते. नाल्याचे बांध फुटून पाणी गावात शिरले गावात शिरलेल्या पाण्याने गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पाणी शेतात शिरल्याने गावा लगत व नाल्यांच्या परीसरातील शेत जमीनीवरील पिके अक्षरशः खरडून गेले आहे.राजापूर येथील जिल्हा परिषद शाळा परीसरात पहाटे ५ वाजता फुट पाणी असल्याने तेथील सहादेव सोळंके, रामदास हिवराळे, बबनराव सेजव, तुळशीराम सेजव, मनोज कडू, मुकुंदा भागवत विनोद चक्रे, मारोतराव गाडगे, यांच्या घरात पाणी शिरल्याने या कुटुंबीयांना जिल्हा परिषद शाळा व महादेव मंदिरात स्थानांतरीत करावे लागेले यामध्ये यांच्या घरातील अन्नधान्य ओले झाले व महादेव सोळंके यांनी अनुदान घरकुलबांधण्यासाठी आणलेले १५ पोती सिमेंट वाया गेले आहे.

कवठा सोपीनाथ येथील बाळू बाजड यांचे मातीत बांधकाम असलेले अर्धे घर पडून त्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे असून कुठलीही जीवितहानी झाली नाही.

कुरूम इथेही हिच परिस्थिती असून इतवारा, आठवडी बाजार, माळीपूरा, शिवनगर, मेन रोड, पंचशील विद्यालय, भोईपुरा, चांभारपूरा, मातंगपूरा, जामठी रोड मुस्लिम वस्ती या परीसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने १० कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत स्थानांतरीत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. कुरुम गावालगत राष्ट्रीय महामार्ग जात असून महामार्गाचे काम चालु आहे. या कामा मुळे गावा बाहेरून वाहणाऱ्या होळी नाल्याचे पाणी पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसे या नाल्याला काही अंतरावर चार नाले येऊन मिळत असल्याने नाल्याचे पाणी गावात शिरले आहे यात येथील गावकऱ्यांच्या अन्नधान्याचेय नुकसान झाले आहे.

आपत्ती ग्रस्त गावांना आमदार हरीष पिंपळे, नायब तहसीलदार माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे, फरताडे, विस्तार अधिकारी व्ही व्ही किर्तने हे भेटी देत आहेत.

अधिक वाचा : तेल्हारा शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांसह दुकांधारकांवर सुद्धा होणार कारवाई

Tags: AkolaHeavy rainfall in MurtijapurMurtijapurअकोलामूर्तिजापूर
Previous Post

अजय देवगण चाणक्यची भूमिका करणार

Next Post

तेल्हारा तालुक्यातील आरसुुुळ येथे वृक्षारोपण

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
तेल्हारा तालुक्यातील आरसुुुळ येथे वृक्षारोपण

तेल्हारा तालुक्यातील आरसुुुळ येथे वृक्षारोपण

तेल्हारा तालुका शिवसेनेची आढावा बैठक संपन्न

तेल्हारा तालुका शिवसेनेची आढावा बैठक संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.