सार्वजनिक बाधंकाम अकोला व ऊपविभाग अकोटच्या जबाबदार अधिकार्यासह कञांटदार व अकोट मतदार सघांच्या लोकप्रतीनिधिना पडला अकोट शहरातील महत्वकाक्षी चौपद्रीकरणाच्या कामाचा विसर?
अकोट (सारंग कराळे)-अकोट शहरातील महत्वपूर्ण असलेला अकोला नाका ते विश्राम गुहापर्यतच्या रस्ताचे चौपदिकरणाच्या काम पुर्ण करण्याची मुदत सपुन एक वर्ष पुर्ण झाले असुन अद्यापही चौपदिकरणाचे काम जागोजागी अर्धवट स्वरुपात आहे गेल्या तीन वर्षापासुन सुरु असलेले चौपदिकरणाचे काम पुढिल एक वर्ष पुर्ण व्हायची लक्षणे दिसुन येत नाहीत.
सा.बा.विभागाचे अधिकारी व कञांटदार यांनी अकोट शहर वासीयाना विकासाच्या नावावर अनंत यातना देऊनही रस्ताचे काम पुर्ण करण्याविषयी कोणतीस ठोस पाऊले उचलली जात नाहीत हे याच्या चौपदिकरणाचे बदल असलेली उदासिनतेचे जीवंत उदारण आहे.
सा.बा.विभागाचे अधिकारी व कञांटदार यानी विद्दुत पुरवठा केबल भुमीगत करण्याचे काम पर्ण करण्यापुरवीच विद्दुत पोल डी पी व तोडलेल्या झाडाचे अवशेष (मुळे व खोड) तसेच ऊभे असताना सुद्धा प्रचंड घाईतच अधुंरे डाबंरीकरणाचे काम सशांस्पद रित्या उरकुन घेतले आहे या रस्तावर आजही कित्येक ठिकाणी झाडे खोडे विद्दुत पोल डीपी तसेच ठिक ठिकाणी खड्डे अधुर साईड नाल्याचे बाधकाम पडले असुन केलेल्या डाबंरीकरण अत्यंत हिन दर्जाचे आहे.
याच रस्तावर जिल्हा मध्यवर्ती बॕक ते अकोला नाक्यापर्यत रस्ताच्या दुतर्फा नाल्याची अवस्था हि कचरा कुडी समान झाली आहे. तसेच रहदारीच्या रस्तावर दोन्ही बाजुस अतीकर्मण पुन्हा थाटले गेल्या मुळे वाहतुकीस अडथडा निर्माण होऊन अनेक वेळा कीरकोळ अपघात झाले आहेत. हे काम जेव्हा ब्रेक बाद चालु करणायत येईल तेव्हा पुन्हा तयार केलेला रस्ता विद्दुत केबल भुमिगत करण्यासाठी काही ठीकाणी पुन्हा फोडुन हॕन्ड पम्प टाकावे लागणार आहेत.
त्यामुळे डाबंरीकरण एकसंघ राहु शकणार नाही व रस्ताचे आयुष्य कमी होईल यात शंका नाही विद्दुत केबल भुमिगत करण्याचा प्रस्तावाचा पाठपुरावा करणाचे काम गेल्या तिन वर्षॉपासुन न करता केवळ वेळ काढु भुमिका बजावणारे सा. बा विभागाच्या अधिकार्याच्या बुद्धिची कीव करावशी वाटते की रस्ताच्या दोन्ही बाजुस दुतर्फा बाधंण्यात आलेल्या नाल्या पावसाचे पाणी वाहुन नेण्याकरीता बाधण्यात आल्या की कचरा कुडी करीता की जनतेचा पैसा नालीत टाकण्या साठी हे समजण्यास मार्ग नाही. कारण या नाल्यान वर पुर्ण पणे स्लॕब टाकुन त्या बंदिस्त करण्यात येत आहेत तरी ठिक ठिकाणी अर्धवट काम केले असुन रस्तावर पाणी वाहुन जाण्यास जागाच नाही.
तसेच डाबंरीकरणाच्या दोन्ही बाजुस खुली जागा सोडली असुन या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्याचे बोले जात आहे असे असेल तर ब्लॉक मधुन डाबंरी रस्ताताचा खाली मुरुन रस्ता लवकर उखडण्यास मदतच करेल हे सागंण्यासाठी कुठल्या भविष्यकाराची गरज नाही. गेल्या तिन वर्षॉपासुन सा. बा. विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यानी पाहणी केली नसुन सर्व राम भरोसे सुरु आहे तसेच अकोट मतदार सघांचे विकास महर्षि लोक प्रतिनिधि साहेबानी याच चौपदिकरणाचा नावावर अकोट मतदार सघांतिल विकास कामाना सुरुवात केली होती.
इतके अथक प्रयत्न करुन विकास निधी आणला होता व विकास चा नावावर अकोट नगर पालिकेत अध्यक्ष सह बहुमतात नगरसेवक निवडुन आणले होते याचा विसर विकास महर्षि लोक प्रतिनिधिना पडला असवा नाहीतर चौपदिकरणाच्या विषयावर सबंधित विभागाच्या अधिकार्याना व कञांटदारला जाब विचारला असता व विद्दुत विभागाला निधि उप्लबध करुन देवुन रोडचे काम मार्गी लावले असते.
लोक प्रतिनिधिचे या विषयावर मौन व्रत धरणे अतिशय दुर्दैवाची बाब आहे. रस्ताचे चौपदिकरणाचे काम म्हणजे बटीं बबली चा खेळ सुरु असल्याचे वाटत असुन अकोट जनता खुप सहन शिल असुन याच्याशी कुणी कसही वागावे अकोट जनता माञ आपला सयंम सोडण्यास तयार होत नाही. ती फक्त 5 वर्षातुन एकदाच जागी होते, असा अनेकाचा भ्रम आहे तो त्यानी कायम ठेवावा. माञ सा. बा अधिकारी व कञांटदारानी त्याचे कामे मर्यादित वेळेतच राहुन पुर्ण करावी जनतेचा सयंम पाहु नये अशी मागणी जनतेतुनच होत आहे.
सा. बा. विभाग अकोला कार्यकारी अभिंयता निखलेश चव्हाण याच्याशी दुरध्वणी द्वारे सर्पंक साधला असता त्यानी सागितले की विद्दुत वितरण कपंनीला कामा करीता लागणारा निधि अपूर्ण दिला गेला असुन पुर्ण निधि प्राप्त होताच विद्दुत पोलाचे काम पुर्ण झाल्यानतंर एका वर्षाचा आत आम्ही चौपदिकरणाचे काम पुर्ण करण्याचे प्रयत्न करु.
अधिक वाचा : महावितरण च्या कर्मचाऱ्यां कडून 33 के व्ही उपकेंद्र मनात्री येथे वृक्षरोपण