अकोला – महापालिकेच्या मालकीच्या एक कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळा प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या नगरेसवीका पुत्र शेख नवेद यास बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवाणगी केली.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर महापालिकेच्या मालकीचा नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ असा चार हजार स्क्वेअर फूट भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकल्याचे दाखविले होते.
त्यानंतर खरेदी-विक्रीच्या आधारेच भूमि अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भूखंडाची नोंद शेख नवेद याच्या नावे घेतली होती; मात्र बुढन गाडेकर यांच्या तक्रारीनंतर ही नोंद रद्द करण्यात आली. त्यानंतर गाडेकर यांनी मनपा व पोलिसात वारंवार तक्रारी दिल्यानंतर मनप आयुक्तांच्या प्रस्ताववरुन सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात शेख नवेद शेख इब्राहीम व रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शेख नवेद याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवाणगी केली आहे.
रमेशचंद्र अग्रवालला वाचविण्यासाठी सत्तेतील लोकप्रतिनिधींनी आटापीटा सुरु केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार रमेशचंद्र अग्रवाल असतांना त्याने स्वताची सुटका करण्यासाठी शेख नवेद यांनीच हा घोळ केल्याचे दाखविण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्याच्यावरील आरोप लक्षात घेता शोध सुरु केला आहे.
लोकप्रतिनिधीने पोलीस अधीक्षकांची भेट घेउन त्याला या प्रकरणातून काढण्यासाठी प्रयत्न केले, मात्र काहीही उपयोग झाला नसून पोलीसांच्या ठाम भुमीकेने या लोकप्रतिनिधीचा हीरमोड झाला आहे.
अधिक वाचा : अकोला येथे विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांवर कारवाई