मुंबई : संततधार पावसाचा मुंबई लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. अंधेरी येथील गोखले ब्रिजचा फूटपाथचा काही भाग रेल्वे स्टेशनवर कोसळला आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर 2 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा गोखले ब्रिज आहे. पुलाच्या बाजूचा फूटपाथ कोसळला आहे.
सकाळी पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर पुन्हा काही भाग कोसळला. हा भाग ट्रॅकवर कोसळल्यानं मोठ्या प्रमाणावर ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा हलवण्यात अडचणी येत आहेत.
हा पूल बी. एम. सी.च्या अखत्यातीरीतील आहे. या ठिकाणी National Disaster Response Force चं पथक तैनात करण्यात आलं आहे.
पुलाचा कोसळलेला भाग बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणखी किती वेड लागेल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रल्वे चं काही प्रमाणात नुकसान झाल्याची हि शक्यता आहे.
कोसळलेला पूल नक्की रेल्वेचा होता कि मुंबई महानगर पालिकेने बांधलेला होता, याची माहिती आता घेतली जाणार आहे. सध्या तरी रेल्वेकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आलेले आहेत. पुलाचा भाग बाजूला करण्यासाठी पथक दाखल झालेले आहे.