? पॅन कार्ड साठी हवा आधार क्रमांक
नवी दिल्ली – आयकर विभागाने एका सेंकदात पॅन कार्ड मिळेल अशी ‘इस्टंट’ प्रणाली सुरू केली आहे. या सुविधेतून अर्जदाराला काही क्षणात विनामूल्य ई-पॅन मिळणार असून ही सुविधा ठराविक कालावधीसाठी सुरू केली आहे. या कालवधीत अर्ज करणार्या अर्जदाराचा अर्ज ग्राह्य धरून आधार कार्ड असलेल्या अर्जदारालाच हे ई-पॅनकार्ड मिळेल. आधार क्रमांकाला जो मोबाईल क्रमांक जोडलेला असेल त्यावर एक वन टाईप पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. त्यावरून अर्जदाराला पॅनकार्ड मिळेल.
? पॅन आधार क्रमांक लिंक करण्याची मुदत वाढवली
अर्जदाराच्या आधारवरील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक पॅनवर नमूद असेल. ई-पॅन हे फक्त एका व्यक्तीसाठी असून ते एका कुटुंबं अथवा संस्थेसाठी नसेल. आधारवर आधारित पॅन कार्ड बनल्यानंतर अर्जदाराला ते पोस्टाने घरपोच मिळेल. ई-पॅनसाठी अर्जदारांनी https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर लॉग ईन करण्याचे आवाहन आयकर विभागाकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा : नव्या फिचरमुळे व्हॉटसअॅप चा अॅडमिन सर्वशक्तिमान झाला, वाचा सविस्तर.