अकोला(प्रतिनिधी)-जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या वतीने अकोला जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की आपल्या गावात ,शेतवस्तीवर,अपरिचित,मनोरुग्ण, संशयित वाटणारे,भटके,साधू वेशातील लोक यांना नुसत्या संशयावरून अफवांवर विश्वास ठेवुन मारहाण केल्याचे बरेच प्रकार निर्दनास येत आहेत.त्यांना चॉकशी करीता पोलिसांच्या ताब्यात द्या कायदा हातात घेऊ नका अनोळखी व्यक्तीस मारहाण केल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात. काही समाज कंटक सोशल मीडियावर अफवा पसरवून समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत.
अशा प्रकारच्या खोडसाळ बातम्यांना बळी न पडता संशयित व्यक्तींना मारहाण न करता आपल्या गावातील पोलीस पाटील,जिल्हा नियंत्रण कक्ष ,नजीकचे पोलीस स्टेशन,यांच्याशी संपर्क करून त्यांची मदत घ्या.खोटी अफवा पसरवनाऱ्यावर कलम ५०५(१)भांदवि नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.