अकोला : जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय अकोला हे सफाई कामगारांचे पद रिक्त असताना सुद्धा प्रलंबित प्रकरणातील ज्येष्ठ उमेदवार सुनील भगवान जाधव ह्यास लाड कमिटीच्या शिफारसीनुसार नियुक्ती देत नाही.
प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत नियुक्ती नाकारत असले तरी वि. न्यायालयातून केव्हाचेच प्रकरण काढण्यात आले असून वि. न्यायालयाने व सरकारी वकिलांनी मार्गदर्शन देऊनही नियुक्ती देत नाही. कारण मात्र समजू शकले नाही.
माननीय संचालक साहेब आरोग्य सेवा मुंबई ह्यांनी सुद्धा एका परिपत्रद्वारे लाड कमिटीचे शिफारसीनुसार तात्काळ नियुक्त्या देण्याचे परिपत्रक काढले आहे. अनास्था दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाही करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद असताना जिल्हा शल्यचिकित्सक ऐकण्यास तयार नाही.
उपासपोटी मरण्यापेक्षा श्री सुनील भगवान जाधव हे दि. २६/६/२०१८ पासून मा. जिल्हाधिकारी साहेब अकोला ह्यांचे कार्यालयासमोर ऐन पावसाळ्याच्या दिवसात आमरण उपोषणात बसलेले असून मागणी मान्य होईस्तोवर उपोषण सोडणार नाही असेही पत्रकात नमूद केले असून उपोषणाचे नेतृत्व श्री अनुप खारारे प्रदेश उपाध्यक्ष, श्री पी. बी. भातकुली प्रदेश महामंत्री, श्री शांताराम निंधाने जिल्हा अध्यक्ष , जिल्हा महानगर अध्यक्ष विजय सारवान , कार्यकारी अध्यक्ष हरिभाऊ खोडे , धनराज सत्याल, उपाध्यक्ष रमेश गोडाले, युवा प्रकोटचे श्री बबलू उर्फ गुरु सारवान, मदन धनजे , एलके नकवाल , ईश्वर थामेत, मनोज निंधाने विभागीय अध्यक्ष, तसेच सचिन चावरे विभागीय सचिव, देविदास पारोचे शाखा अध्यक्ष, राहुल सारवान , सोनू पाचेरवाल, शिव बोयत , प्रताप झंझोटे, नारायण मकोरिया, अमर डिकावं, सतीश पटोने , गणेश टांक, राजू गोहर, अशोक गोहर, आदी कार्यकर्ते सहकार्य करत असून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस चा पाठिंबा आहे.
अधिक वाचा : खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार