टेलोकॉम कंपन्यांमधील सुरू असलेले प्राईज वॉर दिवसेंदिवस वाढत आहे.
मुंबई : टेलोकॉम कंपन्यांमधील सुरू असलेले प्राईज वॉर दिवसेंदिवस वाढत आहे. चांगल्या ऑफर्स, अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंगचे स्वस्त दर याचा फायदा मिळवण्यासाठी अनेकजण नंबर पोर्टबिलिटीचा फायदा घेत होतो. नंबर पोर्टबिलिटीची सुविधा बंद करण्यात आली आहे. मार्च 2019 पासून ग्राहकांना मोबाईल नंबर बदलायचा झाल्यास कंपनी बदलणंदेखील बदलावी लागणार आहे.
का बंद होणार मोबाईल नंबर पोर्टबिलिटीची सुविधा ?
इकोनॉमिक टाईम्सच्या माहितीनुसार, मोबाईल नंबर पोर्टबिलिटीसाठी काम करणारी एमएनपी इंटरकनेक्शन टेलीकॉम सॉल्यूशन्स आणि सिनिवर्स टेक्नोलॉजी तोट्यात आहे. जानेवारी महिन्यापासून पोर्टिंग फीमध्येही 80% कपात केल्याने त्यांना सतत तोटा होत आहे. मार्च 2019 महिन्यात या कंपन्यांचे लायसन्स संपत असल्याने ही सेवा बंद होणार आहे.
ग्राहकांना नुकसान
पोर्टबिलिटीची सुविधा बंद पडल्याने ग्राहकांनाच त्याचे नुकसान होणार आहे. कॉलिंग़ रेट, टेरिफ रेट याबाबत ग्राहकांच्या सतत समस्या असतात. यावर सर्व्हिस प्रोव्हायडर बदलणं हा सोपा उपाय होता. मात्र सर्व्हिस कंपन्यांनी त्यांचं लायसन्स रिन्यू न झाल्यास त्याजागी पर्याय शोधावा लागणार आहे. त्याद्वारा मोबाईल नंबर पोर्टबिलिटीची सुविधा पुढेही लागू केली जाऊ शकते.
कंपन्या लायसन्स सरेंडर करणार
दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये मोबाईल नंबर पोर्टबिलिटीचे काम पाहणारी एमएनपी इंटरकनेक्शन ही कंपनी त्यांचं लायसन्स सरेंडर करणार आहे. त्यानंतर काम बंद होईल. तर उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये काम करणारी सिनिवर्स टेक ही कंपनी तोट्यामध्ये आहे. मे महिन्यापासून सुमारे 2 कोटी अॅप्लिकेशन्स प्रोसेसमध्ये आहेत.
कोर्टात पोहचलं प्रकरणं
सर्व्हिस देणार्या कंपन्यांच्या मते, ट्राईचा कारभार हा मनमानी आणि पारदर्शक न ठेवता मोबाईल नंबर पोर्टबिलिटी चार्ज घटवण्यात आले. या प्रकरणी कोर्टामध्ये दाद मागण्यात आली आहे. त्याची पुढील सुनावणी 4 जुलैला होणार आहेत. या प्रकरणात पर्याय न निघाल्यास पोर्टबिलिटीची सुविधा बंद पडू शकते.
जानेवारी महिन्यात कमी केले दर
जानेवारी 2018 मध्ये TRAI ने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचा दर 19 रूपयांवरून 4 रूपये करण्यात आला आहे. यामुळे मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी
देणार्या कंपन्यांना नुकसान झाले आहे. 2017 साली रिलायन्स जियोची टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री झाल्यानंतर मोबाईल नंबर पोर्टबिलिटीसाठी करण्यात येणार्या अर्जांमध्ये चारपट वाढ झाली आहे.
काही कंपन्या बंद पडल्या
रिलायंस कम्युनिकेशंस, टाटा टेलीसर्विसेज, एयरसेल आणि टेलीनॉर इंडिया या कंपन्या बंद पडल्याने अनेक ग्राहकांनी सर्विस प्रोव्हायडर बदलण्याचा निर्णय घेतला. भारती एयरटेल, आइडिया आणि वोडाफोन या कंपन्यांना नवीन ग्राहक बनवणं कठीण झालं आहे. त्यामुळे ग्राहकांना खूष ठेवण्यासाठी नवनव्या आकर्षक ऑफर्स आणणं गरजेचे झाले आहे.
Comments 1